महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान स्टारर 'सिकंदर'च्या स्टारकास्टमध्ये रश्मिका मंदान्ना सामील, कृतज्ञतेची भावना केली व्यक्त - Rashmika Mandanna - RASHMIKA MANDANNA

संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर रश्मिका मंदान्नाचा समावेश 'सिकंदर'च्या स्टार कास्टमध्ये झाला आहे. सलमान खानबरोबर स्क्रिन स्पेस करण्याची संधी तिला मिळाल्यामुळे ती आनंदित आहे.

Rashmika Mandanna and Salman
सलमान स्टारर 'सिकंदर'च्या स्टारकास्टमध्ये रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna and Being Salman Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 1:40 PM IST

मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना चित्रपटाच्या जगतात एक स्वप्नमय प्रवास करत असताना तिला आता सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून सामील करण्यात आले आहे. हा चित्रपट नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या साजिद नाडियादवाला यांच्या वतीनं बनवण्यात येत असून 2014 मध्ये 'किक' चित्रपट रिलीज झाल्यानंतर सलमानचे साजिदबरोबर पुनरागमन झाले आहे. आता प्री-प्रॉडक्शनमध्ये असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल आणि 2025 च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवर ही बातमी शेअर करताना रश्मिकानं लिहिले: "तुम्ही खूप दिवसांपासून मला पुढील अपडेटसाठी विचारत होतात आणि हे आहे...आश्चर्य! सिकंदर चित्रपटाचा एक हिस्सा बनल्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आणि सन्मानित आहे. ईद 2025 ला सिनेमा रिलीज होत आहे.!"

'सिकंदर'च्या स्टारकास्टमध्ये रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna)

'अ‍ॅनिमल' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर रश्मिकानं आता हा नवीन हिंदी चित्रपट साइन केला आहे. रश्मिकाचा अभिनेता सलमान, दिग्दर्शक दिग्दर्शक एआर मुरुगोदास आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या बरोबरचा हा पहिलाच प्रोजेक्ट असेल. गुरुवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी रश्मिका मंदान्ना कलाकारांमध्ये सामील झाल्याची घोषणा केली. त्यांनी X वर पोस्ट केले: “सिकंदर चित्रपटामध्ये सलमान खान बरोबर''

रश्मिका मंदान्नानं कन्नड, तेलुगु आणि तमिळ चित्रपटातून नाव लौकिक कमवल्यानंतर तिनं 2022 मध्ये 'गुडबाय' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर तिनं 'मिशन मजनू' आणि 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये भूमिका केल्या. ती विक्की कौशलच्या बरोबर 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटामध्येही दिसणार आहे. रश्मिका आगामी महत्त्वकांक्षी 'पुष्पा: द रुल' चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनबरोबर, धनुषबरोबर 'कुबेर' या चित्रपटांचीही तयारी करत आहे.

'गजनी' फेम दिग्दर्शक एआर मुरुगोदास सिकंदर या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग वेळेत पूर्ण व्हावे यासाठी निर्मात्यांनी खूप काळजीपूर्वक शूटिंग वेळापत्रक तयार केल्याचं समजते. सलमान खानला धमक्या मिळत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव याचे शूटिंग मुंबई बाहेर केले जाणार असल्याचेही समजते. यासाठी हैदराबाद हे सोयीचे ठिकाण असल्याचे मत निर्मात्यांचे आहे. सध्या सलमानला सरकारी सुरक्षा पुरवली असून त्याच्या प्रत्येक हालचाली आधी सुरक्षा रक्षक काळजी घेत आहे.

हेही वाचा -

  1. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case
  2. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल, कॅमेरा बघताच केलं 'हे' कृत्य - Deepika Padukone and Ranveer Singh
  3. दिग्दर्शक संगीत सिवन यांचे 61 व्या वर्षी निधन, सेलेब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली - Sangeet Sivan passes away

ABOUT THE AUTHOR

...view details