मुंबई - Tisha Kumar Demise :टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची चुलत बहीण आणि अभिनेता कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमारचं निधन झालं आहे. 6 सप्टेंबर 2003 रोजी जन्मलेली तिशा गुलशन कुमार यांची भाची आणि संगीतकार अजित सिंह यांची नात होती. तिशा बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. तिच वय फक्त 21 वर्ष असून कमी वयात गेल्यानं अनेकजण आता सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत आहेत. रिपोर्ट्सवर तिशा याआधी मुंबईत कॅन्सरवर उपचार घेत होती. यानंतर तिला उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं होतं. तिशाचा जर्मनीतील रुग्णालयात गुरुवारी 18 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तिशा कुमारवर मुंबईत अंत्यसंस्कार, सेलेब्रिटींनी दिला भावपूर्ण निरोप - Trishaa Kumar - TRISHAA KUMAR
Tisha Kumar demise: अभिनेता-चित्रपट निर्माता कृष्णा कुमार यांची मुलगी आणि भूषण कुमार यांची चुलत बहीण तिशा कुमारचं कर्करोगानं निधन झालंय. आज तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
Published : Jul 22, 2024, 3:12 PM IST
टी-सीरीजनं जारी केलं निवेदन :टी-सीरीजच्या प्रवक्त्यानं एक निवेदन जारी केलं की, "कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमारचं काल गुरुवारी आजारानं निधन झालं आहे. कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा." तिशा नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिली आणि काहीवेळा ती टी-सीरीजच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगमध्ये दिसली होती. अलीकडेच तिनं 30 नोव्हेंबर 2023 रोजी रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल'च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. दरम्यान आज 22 जुलै रोजी तिशा कुमारवर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी भूषण कुमार, फराह खान, दिव्या खोसला कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज सायंकाळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
तिशा ही कृष्णा कुमार यांची मुलगी :तिशाचे वडील कृष्णा कुमार यांनी 90 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये काम केलंय. 'बेवफा सनम' सारख्या चित्रपटात ते दिसले आहे. त्यांनी शिल्पा शिरोडकर, अरुणा इराणी आणि शक्ती कपूर यांसारख्या स्टार्सबरोबर काम केलंय. कृष्णा कुमार हे टी सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ आहेत. अभिनयात यश न मिळाल्यानं त्यांनी टी-सीरिजची जबाबदारी स्वीकारली. आता ते त्यांचा पुतण्या भूषण कुमारबरोबर कंपनी चालवतात. टी सीरीजचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.