मुंबई : विकी कौशल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्य 'छावा' या ऐतिहासिक काळातील नाट्यमय चित्रपटानं प्रेक्षकांमध्ये खूप प्रेम मिळवलंय. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलनं प्रे7कांची मनं जिंकलेत. 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि देशभरात लोकप्रिय झाला आहे. आता, सोशल मीडियावर 'छावा'च्या तेलुगू आवृत्तीची मागणी सुरू झाली आहे.
'छावा' या चित्रपटाच्या तेलुगू डबिंगची मागणी वाढली -'छावा'च्या तेलुगू भाषेतील आवृत्तीची एक्स हँडलवर वेगानं मागणी येत आहे. काही लोकांनी 'छावा'च्या निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात इंग्रजी सबटायटल्स जोडण्याची विनंती केली आहे. त्याच वेळी, छावा हा चित्रपट केवळ हिंदी प्रेक्षकांपुरता मर्यादित ठेवल्याबद्दल अनेकांनी निर्मात्यांना फटकारलं आहे. 'छावा' वर एका युजरनं लिहिलं की, 'कृपया 'छावा' हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित करा, मी तो हिंदी सबटायटल्समध्ये पाहिला पण काहीही समजलं नाही'. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, 'कृपया शिवाजी आणि संभाजी महाराजांचा वारसा आणि शौर्य फक्त हिंदी भाषेपुरतं मर्यादित ठेवू नका, ते तेलुगूमध्येही प्रदर्शित करा, प्रत्येक भारतीयानं ही कथा पाहावी.' एका युजरनं छावा, मडॉक फिल्म्सच्या निर्मात्यांना 'छावा' हा चित्रपट लवकरात लवकर तेलुगूमध्ये प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे.