महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

करण जोहरबरोबर काम करण्यासाठी टायगर श्रॉफ सज्ज, लवकरच आगामी चित्रपटाची घोषणा होणार - Tiger Shroff and KARAN JOHAR - TIGER SHROFF AND KARAN JOHAR

Tiger Shroff New Movie: टायगर श्रॉफला एक बिग बजेट चित्रपट ऑफर झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे.

Tiger Shroff New Movie
टायगर श्रॉफचा नवीन चित्रपट (Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 11:20 AM IST

मुंबई - Tiger Shroff New Movie:अभिनेता टायगर श्रॉफला त्याच्या फिटनेसबरोबर ॲक्शनसाठी ओळखले जाते. याशिवाय तो डान्स करण्यामध्येदेखील अव्वल आहे. टायगर अलीकडेच अक्षय कुमारबरोबर बिग बजेट चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसला होता. टायगरला आणखी एक बिग बजेट चित्रपट मिळाला आहे. या आगमी चित्रपटात टायगर एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. रिपोर्टनुसार, करण जोहर त्याच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. टायगर 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर या चित्रपटाद्वारे खळबळ उडवून देईल. या चित्रपटाचं शीर्षक सध्या ठरलेलं नाही.

करण जोहर आणि टायगर श्रॉफ करणार एकत्र काम :लवकरच या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा होणार आहे. हा चित्रपट बिग बजेट असणार आहे. टायगर श्रॉफ हा दुसऱ्यांदा करण जोहरबरोबर काम करत आहे. याआधी दोघांनी 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्येही एकत्र काम केलं होतं. अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांनी या चित्रपटातून डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. मात्र, या चित्रपटामधील गाणी खूप हिट झाली होती. आता खूप दिवसांपासून टायगरनं एकही चित्रपट हिट दिला नाही. सध्या करण आणि टायगर या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. आता टायगरचे चाहते या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटाबद्दल :टायगर श्रॉफ लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील टायगरचा लूकही समोर आला होता. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. 'सिंघम अगेन' हा चित्रपट 15 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. याचं दिवशी अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' देखील प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'सिंघम अगेन'मध्ये टायगरबरोबर करीना कपूर आणि अजय देवगण दिसणार आहेत. हा चित्रपट 200 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क; नदीम खान आणि सलमान खानची मतदान केंद्रावर झाली भेट - Lok Sabha Elections 2024
  2. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केलं 'हे' आवाहन - Ashok Saraf
  3. 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवालला बॉलिवूडमध्ये करायचं आहे कमबॅक - aashiqui fame anu aggarwal

ABOUT THE AUTHOR

...view details