मुंबई - Tiger Shroff Relationship : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या कथित रोमान्सची चर्चा 2022 मध्ये रंगलेली असतानाच त्यांच्या ब्रेकअपची बातमी झळकली होती. असं असलं तरी टायगरच्या कुटुंबाशी दिशाचं घट्ट नातं कायम राहिलं. तिनं त्यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवले आहेत. ती अनेकदा टायगरची बहीण कृष्णा आणि आई आयेशा श्रॉफबरोबर वेळ घालवताना दिसत असते, तसेच टायगरबरोबर तिनं आपली मैत्रीही ठेवली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत टायगरनं दिशा पटानीबरोबर पॅचअप झाल्याचा गोष्टीवर भाष्य केलं. मुलाखतीदरम्यान, टायगरला त्याच्या नातेसंबंधाच्या स्थितीबद्दल विचारण्यात आलं. मुलाखत घेणाऱ्यानं त्याला दिशा पटानीसह असलेल्या संबंधाबद्दल विचारलं की, "आपकी जिंदगी किस दिशा में जा रही है?" यावर टायगरनं हुशारीनं उत्तर दिलं, "मेरी एक ही दिशा है लाइफ में... और वो है मेरा काम."
अलीकडेच दिशा अक्षय कुमारच्या घरी होळी साजरी करण्यासाठी टायगरबरोबर सामील झाली होती. सणासुदीचे क्षण शेअर करताना, तिने त्याच्या संगतीत घालवलेल्या आनंदी क्षणांचे स्निपेट्स देखील पोस्ट केले. यामुळे दिशा आणि टायगरनं त्यांच्या रोमान्सला पुन्हा आरंभ केल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता.
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांची जोडी यापूर्वी 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'बेफिक्रा'च्या म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. त्यानंतर अहमद खानच्या अॅक्शन-थ्रिलर 'बागी 2' (2018) मध्येही त्यांनी एकत्र काम केले होते. दिशाने 'बागी 3' (2020) मधील 'डू यू लव्ह मी' या गाण्यातही विशेष भूमिका साकारली होती.
टायगरच्या व्यावसायिक प्रयत्नांबद्दल बोलताना तो अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या बरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित, हा चित्रपट 10 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. शिवाय, टायगर जगन शक्ती दिग्दर्शित एका शीर्षकहीन चित्रपटातही दिसणार आहे. तो रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या कॉप युनिव्हर्स चित्रपटामध्ये देखील सामील झाला आहे. यामध्ये तो एसीपी सत्य पटनाईकची भूमिका साकारत आहे.