मुंबई - असं म्हणतात की, कोकणातले लोक म्हणजे शहाळ्यासारखे, बाहेरून कडक तर आतून मृदू आणि गोड असतात. कोकणात एखादे चांगले कार्य सुरु करताना देवाला साकडं घालण्याची एक प्रथा आहे . ते कार्य सुकर होवो म्हणताना इतर मंडळी त्यास दुजोरा देत म्हणतात, 'होय महाराजा'. आता हाच परवलीचा शब्द घेऊन एक चित्रपट येतोय ज्याचे नाव आहे 'होय महाराजा'. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला गेला आणि तो करताना कोकणातील हाकाळीचा उपयोग केलेला दिसून येतो, तो म्हणजे, "पैश्याचा, हास्याचा आणि मनोरंजनाचा बार उडवूक कोकणासून कोकणकन्या एक्स्प्रेसने घेऊन इलो आहोत "होय महाराजा" चो ट्रेलर !!"
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'होय महाराजा' चित्रपटाचा टिझरने कुतूहल वाढवलं होते तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरून या चित्रपटाची जातकुळी क्राईम-कॅामेडी आहे हे स्पष्ट झालं. हा जॉनर सोपा वाटत असला तरी थ्रिलर आणि विनोद यांचे मिश्रण करणं हे खूप कठीण काम आहे. लोकांना घाबरावयाला लावणं हे तसे कठीण काम परंतु त्यांना हसवायला लावणं हे त्याहूनही कठीण काम. परंतु दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी ही तारेवरची कसरत उत्तमरीत्या पूर्ण केली आहे.
होय महाराजा (Hoy Maharaja PR team)
या चित्रपटात रमेश हा एकदम बोलबच्चन तरुण आहे, 'साला मै तो साहब बन गया' टाईप सुटाबुटात इंटरव्ह्ल देण्यासाठी निघालेला असतो. त्याचा मामा आपल्या भाच्यावर खूप प्रेम करीत असतो आणि त्याचा त्याच्यावर गाढ विश्वास असतो की एके दिवशी रमेश खूप मोठा माणूस बनेल. त्याच सुमारास रमेशची भेट आयेशा बरोबर घडते आणि तो पहिल्या नजरेतच घायाळ होतो. पुढे बऱ्याच अतरंगी प्रदांगांतून या चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. रमेशचं प्रमुख कॅरेक्टर प्रथमेश परब साकारत असून अंकिता लांडे आयेशाच्या भूमिकेत दिसेल. मामाच्या भूमिकेत अभिजीत चव्हाण असून यात संदीप पाठकने साकारलेला भाई, समीर चौघुलेचा बॉसचा दरारा आणि वैभव मांगलेचा अण्णा ही पात्रे देखील धुमाकूळ घालताना दिसतील.
होय महाराजा (Hoy Maharaja PR team)
'होय महाराजा' ची निर्मिती एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली झाली असून चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. शैलेश एल. एस. शेट्टी दिग्दर्शित 'होय महाराजा' मधून हास्याची कारंजी फुलताना दिसतील. हा चित्रपट ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
होय महाराजा (Hoy Maharaja PR team) हेही वाचा -
- करण जोहरचा ५२ वा वाढदिवस : बॉलिवूड स्टार घडवणाऱ्या करणचे आगामी प्रोजेक्ट आणि टॉप 5 चित्रपट - Karan Johars Birthday
- कान्स 2024 मध्ये भारताचा डंका, अनसूयानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून रचला इतिहास - Cannes 2024
- सिद्धार्थ मल्होत्रा मतदान करण्यासाठी दिल्लीत दाखल, ईशा गुप्तानं केलं मतदान - Lok Sabha Election 2024