मुंबई - 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल अडचणीत सापडलेले युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांच्या अडचणी वाढत झाली आहे. अश्लील विनोद प्रकरणात जयपूरमध्ये रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्धही गुन्हा दाखल केला गेला आहे. बीएनएस कायदा, आयटी कायदा आणि इतर कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर सेलनं समय रैनाला दोनदा समन्स पाठवले आहेत. समयला 17 फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना अडचणीत : तसेच यानंतर समय रैनाच्या वकिलानं सायबर सेलला सांगितलं होतं की, समय रैना अमेरिकेत आहे आणि 17 मार्च रोजी देशात परतेल. यानंतर सायबर सेलनं रैनाला 18 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान याप्रकरणी 11 फेब्रुवारी रोजी वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शोच्या सर्व भागांमध्ये भूमिका बजावणाऱ्या सर्व सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले गेले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत शोचे अकाउंट निष्क्रिय करण्यात आले होते. सायबर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पहिला वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला.