महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पुन्हा घुमणार 'दुनियादारी'चा आवाज!, निर्मात्यांनी केली चर्चा - SECOND PART OF DUNIYADARI

Punha Duniyadari : 'पुन्हा दुनियादारी'च्या निमित्तानं निर्मात्या उषा काकडे यांची अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्याबरोबर चित्रपटाबाबत चर्चा झाली आहे. आता पुन्हा एकदा 'दुनियादारी'तील मैत्री प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 2:28 PM IST

Punha Duniyadari
पुन्हा दुनियादारी (Etv Bharat)

मुंबई - Punha Duniyadari :अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. आता 'दुनियादारी'च्या दुसऱ्या पार्टबद्दलची बातमी सर्वत्र पसरली आहे. या चित्रपटाविषयी तर्कवितर्कही काढले जात आहेत. आता या सगळ्यावरील पडदा उठला असून अखेर या चित्रपटाचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय. 'पुन्हा दुनियादारी’ असं या चित्रपटाचे नाव असून 'दुनियादारी'तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 'पुन्हा दुनियादारी'मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी एकदा सर्वांना पाहायला मिळेल.

'पुन्हा दुनियादारी’चं होईल आगमन : 'पुन्हा दुनियादारी'च्या निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्याबरोबर या चित्रपटाबद्दल चर्चा केली. उषा काकडे यांनी नुकतेच 'उषा काकडे प्रॉडक्शन' सुरु केले असून यात आगामी 'विकी : फुल्ल ऑफ लव्ह' या मराठी चित्रपटाची निर्मिती होत आहे. याव्यतिरिक्त उषा काकडे या व्यावसायिका आणि समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहेत. एवीके पिक्चर्स, उषा काकडे प्रॉडक्शन्स, मेटाडोर प्रोडक्शन, व्हिडिओ पॅलेस निर्मित आणि प्रदर्शित होणाऱ्या 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करत आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन हे 'पुन्हा दुनियादारी'चे निर्माते आहेत.

'पुन्हा दुनियादारी’मध्ये येईल मैत्रीमध्ये वेगळे वळण : या चित्रपटाबाबत निर्माते अमेय खोपकर म्हणतात, "2013 मध्ये 'दुनियादारी' आल्यानंतर त्याचा गाजावाजा आणि प्रसिद्धी पाहाता 'पुन्हा दुनियादारी'ची उत्सुकता रसिकवर्गाला लागली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही मैत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमबरोबर माझे ऋणानुबंध आहेत. या टीमबरोबर काम करताना अतिशय आनंद होतोय. 'पुन्हा दुनियादारी’मध्ये मैत्रीत आणि प्रेमात काय वळणे येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे."निर्मात्या उषा काकडे या चित्रपटाबद्दल म्हटलं, "दुनियादारी ही माझी सर्वात आवडता चित्रपट आहे. या चित्रपटचा दुसरा पार्ट येतोय. मी या चित्रपटची निर्मिती करतेय याचा मला प्रचंड आनंद आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लेखक, दिग्दर्शकांच्या निर्माती म्हणून पाठीशी उभे राहून मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध करणे, हा माझा मानस आहे."

'पुन्हा दुनियादारी’च्या शूटिंगला होईल लवकर सुरुवात : दिग्दर्शक संजय जाधव यांनी म्हटलं "शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम 'पुन्हा दुनियादारी'च्या निमित्तानं प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. 11 वर्षांची आतुरता संपत अखेर 'पुन्हा दुनियादारी’च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. एकदा परत या टीमबरोबर एकत्र काम करण्यात मला आनंद येईल. हे बॉण्डिंग इतके स्ट्रॉन्ग आहे की, त्याचे पडसाद 'पुन्हा दुनियादारी' मध्ये निश्चितच दिसतील. आता यात आणखी काय ट्विस्ट असणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. उषा काकडे यांसारख्या निर्मात्या आमच्या या कुटुंबात सहभागी झाल्या आहेत.'' आता अनेक चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट आतुरतेनं पाहात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details