ETV Bharat / bharat

रामाची भूमिका साकारताना हृदयविकाराचा झटका; कलाकाराचा नाट्यमंचावरच मृत्यू - Artist Dies - ARTIST DIES

दिल्लीत रामलीला दरम्यान एका कलाकाराचा हृदयविकाराचा झटक्यामुळं मृत्यू झाला. ही घटना श्री रामलीला कमिटी झिलमिल विश्वकर्मा नगर येथे घडली.

Artist Dies
कलाकाराचा मृत्यू (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 2:01 PM IST

नवी दिल्ली : शाहदरा जिल्ह्यातील विश्वकर्मा नगर भागात शनिवारी रामलीलाच्या कार्यक्रमात एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे. सुशील कौशिक (45 वर्ष) असं मृत कलाकाराचं नाव आहे. ते विश्वकर्मा नगर येथील रहिवासी होते. रामलीलामध्ये ते 'श्री रामाच्या' भूमिकेत होते. ते व्यवसायाने ते प्रॉपर्टी डीलर होते. यावेळी ते जय श्री रामलीला कमिटी झिलमिल विश्वकर्मा नगरमध्ये प्रभू रामाची भूमिका करत होते.

हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू : वास्तविक शनिवारी रात्री अनेक कलाकार मंचावर रामलीला रंगवत होते. यावेळी सुशील कौशिक यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुशील कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये रामलीलामधील पात्र साकारताना दिसत आहेत. त्रास होत असताना ते अचानक नाट्यमंचाच्या मागे गेले. तेथेच बेशुद्ध पडले.

रामची भूमिका साकारताना हृदयविकाराच्या झटक्याने कलाकाराचा मृत्यू (ETV Bharat)
  • राम बोध घाटावर अंत्यसंस्कार : सुशील यांच्यावर रविवारी ज्वाला नगर येथील राम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लवकुश रामलीलामधील एका कलाकाराची प्रकृती शुक्रवारीही बिघडली होती. स्टेजिंग दरम्यान ते बेशुद्ध पडले होते. दिल्लीत नवरात्रीनिमित्त विविध भागात रामलीलाचं आयोजन केलं जात आहे. ते पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येत आहेत.

झटका येण्यापूर्वीच शरीरात दिसतात ‘ही' लक्षणं : आजकाल हृदयविकाराचा झटका आता कुणालाही येऊ शकतो. हृदयविकाराचा धक्का अकस्मात येतो, असा पूर्वी समज होता. मात्र, किमान 10 दिवस ते एक महिनापूर्वीच शरीरात त्याची काही लक्षणं दिसू लागतात. यामध्ये छातीत दुखणे, अस्वस्थता, थकवा आणि धाप लागणे या लक्षणांचा समावेश आहे. वेळीच या लक्षणांकडं लक्ष दिल्यास हृदयविकाराचा धोका टळू शकतो.

हेही वाचा -

  1. एचसीएल टेक्नॉलॉजीच्या कर्मचाऱ्याचा वॉशरूममध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; कंपनीनं निवेदनात काय म्हटलं? - HCLTech Worker Dies
  2. ह्रदयरोग कसा टाळावा? दरवर्षी 18.6 दशलक्षाहून अधिक जणांचा होतो मृत्यू - World Heart Day 2024
  3. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच शरीरात दिसतात ‘ही' सात लक्षणं; दुर्लक्ष केल्यास पडेल महागात - Symptoms Before A Heart Attack

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.