मुंबई - Siblings Day 2024: दरवर्षी प्रत्येकजण 10 एप्रिल रोजी नॅशनल सिबलिंग डे साजरा केला जातो. चला तर मग या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या ग्लॅमरस भाऊ आणि बहीणींच्या जोडीची ओळख करून देणार आहोत. बॉलिवूड स्टार्स अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. बॉलिवूडमध्ये असे स्टार्स आहेत, जे नेहमीच आपल्या भावंडांना सपोर्ट करताना दिसतात.
1 जान्हवी कपूर-खुशी कपूर : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूरची जोडीही खूप लोकप्रिय आहे. या बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जान्हवीनं सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता खुशीनं देखील 'द आर्चीज' चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
2 रणबीर कपूर- रिद्धमा कपूर साहनी :अभिनेता रणबीर कपूर आणि रिद्धमा कपूर हे देखील बॉलिवूडचे खूप स्टायलिश भावंडे आहेत. नुकतेच दोघेही कपिल शर्माच्या शोमध्ये एकत्र दिसले होते. रिद्धमा अनेकदा रणबीरला एक्सपोज करताना दिसते. याशिवाय ती आपल्या भावबरोबर अनेकदा फोटो शेअर करत असते.
3 सारा अली खान- इब्राहिम अली खान : अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय भावंडांपैकी एक आहेत. दोघेही मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. सारानं बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. आता इब्राहिम चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे.
4 ऐश्वर्या राय आणि आदित्य राय : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जगभरात प्रसिद्ध आहे. तर तिचा मोठा भाऊ आदित्य राय मीडियापासून दूर राहतो. ऐश्वर्याचा भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनिअर आहे. ती काही विशेष प्रसंगी आपल्या भावाबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
5 करीना कपूर आणि करिश्मा :अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर अनेकदा एकमेकींना सपोर्ट करताना दिसते. आताचं करीनाचा 'क्रू' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट करिश्मानं पाहिल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
6 अर्जुन कपूर-अंशुला कपूर : स्टाईल स्टेटमेंट करण्यात अर्जुन आणि अंशुला ही जोडी बॉलिवूडमध्ये कोणापेक्षा नाही. अनेकदा अर्जुन आपल्या बहिणीबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो.
7 अथिया शेट्टी आणि अहान : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि अहान शेट्टी नेहमीच बॉलिवूडमधील लोकप्रिय भावंडांपैकी एक आहेत. अथिया तिच्या चित्रपटापेक्षा कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अथियानं काही मोजक्या चित्रपटामध्येचं काम केलंय. आता अहान हा बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा :
- बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएबरोबरच्या खासगी लग्नाबद्दल तापसी पन्नूनं केला खुलासा - taapsee pannu and wedding
- जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा स्टारर 'जोकर 2'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Joker 2 trailer out
- "सारी दुनिया जला देंगे", म्हणत अनंत अंबानींच्या बर्थडे पार्टीत सलमान खान झाला सामील - Salman Khan Joins B Praak