मुंबई - ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात नवीन चित्रपट आणि वेब सीरीज या प्रदर्शित होत असतात. ओटीटीवर गेल्या एका आठवड्यात सर्वाधिक पाहिले गेलेले चित्रपट आणि वेब सीरीजची यादी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. ऑर्मैक्स मीडियाच्या रिपोर्टमध्ये 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरपर्यंत दर्शकांनी कुठले चित्रपट आणि वेब सीरीज सर्वाधिक पाहिले याबद्दल सांगण्यात आलंय. या यादीत कुठला चित्रपट आणि वेब सीरीज जास्त पाहिला गेला याबद्दल जाणून घेऊया.
1. 'द लीजेंड ऑफ हनुमान' डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. याला एका आठवड्यात 4 दशलक्ष दर्शकसंख्या मिळाली.
2. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला कपिल शर्माचा लोकप्रिय 'द ग्रेट इंडियन कपल शो'ला एका आठवड्यात 3.5 व्यूअरशिप मिळाली आहे.
3. काजोल, क्रिती सेनॉन आणि शाहीर शेख स्टारर चित्रपट 'दो पत्ती', जो नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, त्याला 3.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
4. केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा स्टारर कोर्टरूम ड्रामा 'रीटा सान्याल' या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रवाहित होणाऱ्या या शोला एका आठवड्यात 2.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
5. 'फॅबुलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स' सीझन 3 नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आणि त्याला 2.4 व्यूअरशिप मिळाली आहेत.
6. कॉलीन फॅरेल, क्रस्टियन मिलोटी स्टारर 'द पेंगुइन' ही एकमेव परदेशी टीव्ही मिनी सीरीज आहे, ज्याला या यादीत स्थान मिळालं आहे. जिओ सिनेमावर स्ट्रिम होत असलेल्या या सीरीजला एका आठवड्यात 2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
7. मुनावर फारुकी आणि एल्विश यादव यांचा टीव्ही रिॲलिटी शो 'प्लेग्राउंड सीजन 4' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा शो अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर आहे, ज्याला एका आठवड्यात 1.8 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
8. कार्तिक सुब्बाराजच्या 'स्नेक एंड लेडर्स'नं देखील या यादीत स्थान मिळवलं आहे. या सीरीजला 1.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर सीरीज पाहू शकता.
9. 'गेमिंग इन्सान' ही वेब सीरीज 9व्या स्थानवर आहे, जी तुम्ही यूट्यूब आणि अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर पाहू शकता. याला 1.5 दशलक्ष व्ह्यूअरशिप मिळाली आहे.
10. 'रात जवान है' ही वेब सीरीज सोनी लिववर स्ट्रीम झाली आहे. यात बरुण सोबती, अंजली आनंद आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याला 1.4 दशलक्ष व्ह्यूअरशिप मिळाली आहे.