मुंबई- The Great Indian Kapil Show :कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सुरू झाला आहे. हा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनी यांनी हजेरी लावली होती. कपिलच्या शोमध्ये यावेळी नीतू कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी मिळून अनेक गुपिते एकमेकांसमोर उघड केली. या तिघांनी मिळून कपिलच्या शोमध्ये खूप धमाल केली. या शोचा पहिला एपिसोड शनिवारी 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. हा पहिलाच एपिसोड खूप धमाकेदार होता.
रणबीरला ऋषी कपूरनं फटकारलं : शो दरम्यान कपिल शर्मानं नीतू कपूरला विचारले की, तुमच्या कोणत्या सवयी दोन्ही मुलांना आहेत. यावर नीतूनं उत्तर दिले की, ते माझ्यासारखे शांत आहेत. पण त्यांचे वडील ऋषी यांनी त्यांना खूप चांगले संस्कार दिले आहे. त्यांना लोकांचा आदर करायला, पैसा आणि वेळेची कदर करायला शिकवले आहे. यानंतर रणबीर कपूर सांगतो की, तो त्याच्या वडिलांना खूप घाबरत होता. त्यानं म्हटलं ''जर माझ्याकडे वडिलांनी वटारून पाहिलं तर मी रडत होतो. माझे वडील ज्यांच्यावर प्रेम करायचे त्यांनाच टोमणे मारायचे.'' कपिलनं पुढे विचारले की, रणबीरला त्याच्या वडिलांनी कधी मारले आहे का? यावर त्यानं उत्तर दिलं, ''एक प्रसंग सांगतो जेव्हा त्यांनी मला जोरदार फटकारलं होतं. माझे वडील खूप धार्मिक होते. एके दिवशी मी आरके स्टुडिओत गेलो तिथे माझे वडील पूजा करत होते. मी माझे बूट न काढता आत गेलो. हे पाहून वडिलांनी मला टपली मारली होती.''