ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' च्या ट्रेलरचं काउंट डाऊन सुरू, दरम्यान अल्लू अर्जुन-फहद फासिलचे पोस्टर जारी - PUSHPA 2 TRAILERS COUNTDOWN

अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा 2: द रुल'चे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Pushpa 2  poster release
'पुष्पा 2: द रुल'चे नवे पोस्टर (Pushpa 2 poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 5, 2024, 5:38 PM IST

मुंबई - अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2' येत्या 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रिलीजला 1 महिना उरलेला असताना प्रेक्षकांना अस्वस्थ करण्याचं काम निर्माते सतत करत आहेत. कारण निर्मात्यांना देखील प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवायचा आहे. ते एकापाठोपाठ एक चित्रपटाचे अपडेट्स शेअर करत आहेत. चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन आणि खलनायक फहाद फासिल यांचे नवे पोस्टर जारी करण्यात आलं आहे. या पोस्टरबरोबर निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय - "पुष्पा द रुलसाठी एक महिना बाकी आहे. स्वत: ला ब्रेस करा - वर्षातील सर्वात मोठा भारतीय चित्रपट एका महिन्यात थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ट्रेलरचा लवकरच धमाका होईल."

'पुष्पा 2' चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार - 'पुष्पा 2' चे नवीन पोस्टर रिलीज करताना, निर्मात्यांनी घोषित केलंय की, चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाईल. मिळालेल्या नव्या अपडेटनुसार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची टीम नोव्हेंबरपासून 6 शहरांच्या मोठ्या टूरसाठी सज्ज झाली आहे. अल्लू अर्जुन 15 नोव्हेंबरपासून पाटणा, कोची, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबादला भेट देणार आहे. या 6 शहरांचा दौरा 15 नोव्हेंबरच्या सुमारास मेगा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाने सुरू होईल.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज - 'बाहुबली' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याचा दुसरा भाग कधी येणार याची प्रचंड उत्कंठा वाढीस लागली होती. तशीच उत्सुकता 'पुष्पा 2' या पॅन इंडिया चित्रपटाच्या सीक्वेलसाठीही लागून राहिली आहे. चित्रपट कमाईतही विक्रम मोडेल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.

'पुष्पा 2' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पहिल्या दिवशीच्या कमाईचा विक्रम करणारा चित्रपट ठरू शकतो हा विश्वास निर्मात्यांना आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पुष्पा 2' 6 डिसेंबरला रिलीज होणार होता पण आता तो 5 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने, सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या नवीन 'पुष्पा 2: द रुल' पोस्टरसह आतषबाजी सुरू केली आहे. त्यांनी हे पोस्टर दिवाळी सेलेब्रिशन दरम्यान शेअर केलं होतं. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा राजच्या भूमिकेत दिसत आहे आणि रश्मिका तिच्या श्रीवल्ली अवतारात दिसत आहे. दोघेही स्वयंपाकघरात आहेत आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. नव्या पोस्टरच्या आगमनाने चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. नवीन पोस्टरसोबत, त्याने कॅप्शन लिहिलं होतं - "दिवाळीच्या शुभेच्छा."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.