महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कुंभमेळ्यात हार विक्रेत्या मुलीच्या डोळ्यांनी घातलीय जगाला भुरळ, सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींहूनही सरस - BEAUTIFUL GIRL IN KUMBH MELA

प्रयागराजच्या 2025 महाकुंभमध्ये सर्वात सुंदर डोळं असलेली एक मुलगी हार विकत आहे. तिचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Kumbh Mela 2025 Viral Girl
कुंभमेळा 2025 व्हायरल गर्ल ((IMAGE/Viral Video))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 7:42 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत असलेल्या 2025 च्या महाकुंभमेळ्याकडं सबंध जगाचा लक्ष लागलं आहे. १३ जानेवारी रोजी सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ४५ दिवस चालेल. येथे देश आणि जगभरातील भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या नदीत आपल्या पापक्षालनासाठी येत असतात. महाकुंभ मेळा दर १२ वर्षांनी आयोजित केला जातो. यावेळच्या प्रयागराजच्या महाकुंभसाठी करोडो लोक भेट जमत आहेत. संपूर्ण जग भारताच्या या महाकुंभ संस्कृतीची दृश्यं पाहत आहेत. या विशाल महाकुंभ मेळ्यात, आलेल्या एका मुलीच्या सौंदर्याची तारीफ सोशल मीडियावर जोरदार सुरू असून तिचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

समुद्रासारख्या नळ्याशार डोळ्यांची हार विकणारी मुलगी - देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूर येथून आपल्या कुटुंबासह महाकुंभमेळ्याला पोहोचलेली मोना नावाची ही मुलगी रुद्राक्षाचे मणी विकत आहे. या मुलीचे नाव मोना असून तिचे डोळे समुद्रासारखे निळे आहेत. लोकांना तिचा काळाभोर रंग आणि मोठे डोळे आवडले आहेत. काही वेळातच ही मुलगी संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे. मोनाच्या डोळ्यांकडे पाहणारा प्रत्येकजण तिच्या सौंदर्यानं प्रभावित होत आहे. मोनाचा व्हिडिओ फक्त एकानं नाही तर लाखो इंस्टाग्राम युजर्सनी शेअर केला आहे. सध्या, मोनाचं सौंदर्य प्रत्येक दुसऱ्या इंस्टा रीलवर अधिराज्य गाजवत आहे. मोनाच्या सौंदर्याची तुलना मोनालिसाशीही केली जात आहे.

हार विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्यावर सोशल मीडिया युजर्स फिदा - मोनाच्या सुंदर डोळ्यांच्या या व्हिडिओंवर लोक लाईक बटण दाबत आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये सुंदर कमेंट्स पोस्ट करत आहेत. मोनाचे सौंदर्य पाहून एका युजरने लिहिले आहे की, सुंदर मुली फक्त गरीब कुटुंबातच जन्माला येतात. दुसरा एक युजर लिहितो, 'हे डोळे आहेत की समुद्र, यासमोर अभिनेत्रीही अपयशी ठरतात.' तिसरा युजर लिहितो, 'एका गरीब माणसाला एवढं सौंदर्य फक्त देवच देऊ शकतो.' काही युजर तर मोनाला स्वर्गातून आलेली परी म्हणत आहेत. मोनाच्या सौंदर्यावर सोशल मीडिया युजर्सकडून अशाच प्रकारच्या कमेंट येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details