महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिग बॉसमध्ये सदावर्तेंनी उधळले 'गुण', वकिलाचा अवतार पाहून बिथरले स्पर्धक - GUNARATNA SADAVARTEN IN BIGG BOSS

बिग बॉस 18 मध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या वावरानं धमाल आणलीय. आपल्या अनोख्या स्टाईलनं सदावर्ते लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करताहेत.

Gunaratna Sadavarten
गुणरत्न सदावर्ते ((Colors Tv Instagram / screen grab))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 8, 2024, 12:36 PM IST

Updated : Oct 8, 2024, 1:03 PM IST

मुंबई - सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस 18' च्या नव्या सीझनची जबरदस्त सुरुवात झालीय. हा खेळ रंगणार याची झलक पहिल्या दोन दिवसांतच दिसू लागली. प्रत्येक स्पर्धक आपलं स्पर्धेतलं महत्त्व वाढवण्यासाठी, लोकप्रिय होण्यासाठी, प्रभाव टाकण्यासाठी आणि स्वतःचं उपद्रवमूल्य सिद्ध करण्यासाठी पवित्रा घेत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं उपद्रव मूल्य दाखवणारे, मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणारे, घरात गाढव पाळून वेगळेपण सिद्ध करणारे आणि हटके चष्मा, बोलण्याची शैली यामुळे चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्तेंच्या मिश्कील स्वभावाचं दर्शन झालंय. अनपेक्षितपणे समोर आलेल्या या गुणरत्नेंना कसं सामोरं जायचं, यांच्याशी दोस्ती करावी की दुश्मनी, असा विचार आता बिग बॉसच्या घरामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी थेट बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानं अनेकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. घरात येताच सदावर्ते उधळत असलेले 'गुण' पाहून निर्माते मात्र खूश झाले असावेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरातील सदावर्तेंचा एक व्हिडीओ कलर्स टीव्ही आणि बिग बॉसनं शेअर केलाय. यात सदावर्तेंची सुरू असलेली शाब्दिक फटकेबाजी पाहून इतर स्पर्धकांना न्यूनगंड येऊ शकतो.

भाजपाची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव राहिलेले तजिंदर सिंग बग्गा आणि गुणरत्न सदावर्ते यांची पहिल्या दिवशीच गट्टी जमल्याचं दिसतंय. "बग्गाजीसे मेरा रिश्ता इस जन्म में तुटना नहीं है" म्हणत सदावर्तेंनी आपला दोस्तीचा हात पुढं केलाय. मोठमोठ्यानं ओरडून बोलायची सदावर्ते स्टाईल पाहून बाकीचे स्पर्धक थोडे बिथरल्याचं दिसतंय. गुणरत्नेंचा चष्माही कमाल करताना दिसतोय. हा जादुई चष्मा कसा आहे पाहण्यातही स्पर्धक रस दाखवताना दिसले. एकंदरीत पहिल्या दोन दिवसातच गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात हवा निर्माण केली आहे. प्रेक्षकांनाही त्यांचं हे वागणं आश्चर्यचकित करत आहे.

कलर्स टीव्हीनं शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गुणरत्न सदावर्तेंचं कौतुक दिसून येतंय. ''अगर हसना है बेहतरीन इलाज, तो डॉ. गुणरत्न के नुस्के में लिखा है हसी का वेबर्वा राग'', असं कॅप्शन देण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. गुणरत्न सदावर्तेसह 18 स्पर्धक आणि गाढवाची 'बिग बॉस' 18 मध्ये एन्ट्री - Bigg Boss 18 Contestants List
  2. 'गुलिगत धोका' देत सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता; मरी आई पावली - Bigg Boss Winner Suraj Chavan
  3. गावाकडं घर बांधून त्याला 'बिग बॉस' नाव देणार; 'झापुक झुपुक' सूरज चव्हाणनं खेड्यातील तरुणांना केलं 'हे' आवाहन
Last Updated : Oct 8, 2024, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details