महाराष्ट्र

maharashtra

तेजस्विनीची सह्याद्री फिल्म्स आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट संयुक्तपणे 'येक नंबर'ची करणार निर्मिती - Nadiadwala grand son Entertainment

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 2:26 PM IST

Yek Number marathi Movie: तेजस्विनी पंडित आणि साजिद नाडियाडवाला हे 'येक नंबर' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. आता तेजस्विनी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

Yek Number marathi Movie
येक नंबर मराठी चित्रपट (instagram)

मुंबई - Yek Number marathi Movie: अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटनं हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. दोन्ही प्रोडक्शन हाऊस एकत्र येण्यानं मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून अनेकांना आली होती. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' चित्रपट हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'येक नंबर' चित्रपटाबद्दल :'येक नंबर' या चित्रपटाच्या निर्मात्या तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला आहेत. नावावरूनच 'येक नंबर' असणारा हा चित्रपट 10 ॲाक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केलंय. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे अजय -अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर संजय मेमाणे हे 'येक नंबर'चे छायाचित्रकार आहेत. या चित्रपटाबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहे मात्र, यात कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

'येक नंबर' चित्रपटाचं पोस्टर कसं आहे : नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेनं तोंड उभा करून असलेला एक तरुण मुलगा दिसत आहे. त्याच्या जॅकेटवर 'मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' असं लिहिलंय. या मुलाच्या हातात बाटली आणि खिशात एका मुलीचा फोटो दिसत आहे. त्याच्या मनातील धगधगणारी आग यातून व्यक्त होतं असल्याचं या पोस्टरमधून दिसून येत आहे. प्रेमात दंग आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा तरुण नक्की कोण असणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी आता अनेकजण आतुर असल्याचं दिसत आहेत. या चित्रपटाची कहाणी काय असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील. या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. दरम्यान तेजस्विनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिनं या चित्रपटाच्या संबंधित एक व्हिडिओ क्लिप आपल्या चाहत्याबरोबर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details