ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलर लॉन्चसाठी पाटण्याला हजर - ALLU ARJUN

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी पाटणा येथे पोहोचले आहेत.

Pushpa 2 grand trailer launch event
'पुष्पा 2'चा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम (पुष्पा 2 ट्रेलर लॉन्चसाठी पाटणा येथे अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 17, 2024, 4:32 PM IST

Updated : Nov 17, 2024, 5:38 PM IST

मुंबई - वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2'चा ट्रेलर आज 17 नोव्हेंबर रोजी, 'पाटणा', बिहारमध्ये लॉन्च होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2'च्या भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटणा येथे पोहोचले आहेत. अलीकडेच मैथ्री मूव्हीजनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा फोटो शेअर केला आहे. दोघांचा फोटो शेअर करताना त्यांनी यावर लिहिलं, "पुष्पराज आणि श्रीवल्ली, आयकॉन स्टार, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2'च्या भव्य लॉन्च कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटण्याला रवाना झाले आहेत. '

'पाटणा' येथे ग्रँड ट्रेलर लॉन्च कार्यक्रम होईल : 'पुष्पा 2'चा मोस्ट अवेटेड ट्रेलर पाटणा, बिहारमध्ये लॉन्च होत असून आता अल्लू अर्जुनचे चाहते खूप खुश आहेत. पाटणा येथील गांधी मैदानावर अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि श्रीवल्ली यांच्या उपस्थितीत रविवारी हा ट्रेलर लॉन्च होत आहे. गांधी मैदानात दुपारी 3नंतर प्रेक्षकांचा प्रवेश सुरू झाला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य पाहता येणार आहे. त्यामुळे आता या ठिकणी अनेकजण गर्दी करत आहेत. यासोबतच गांधी मैदानावरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंटबद्दल बोललायचं झालं तर चित्रपटाचे कार्यकारी निर्माते यांनी म्हटलं, "पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात आहे."

ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाची कधी होईल सुरुवात : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना येणार असल्यानं इथे भव्य सेट तयार करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी 5:00 ते रात्री 9:00 या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे. 'पुष्पा 2'च्या गाण्यांसोबत चित्रपटाचा ट्रेलरही येथे लॉन्च केल्या जाईल. चित्रपटाचा डिजिटल ट्रेलर 6.03 मिनिटांनी प्रदर्शित होईल. याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल 'पुष्पा 2' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहत आहेत. याशिवाय या चित्रपटाला आगाऊ बुकिंगमध्ये अमेरिकेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटीची कमाई करू शकतो असे आता म्हटले जात आहे.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपटाची प्रतीक्षा... हा सिनेमा 'धूम 4' असण्याचाही प्रेक्षकांचा अंदाज
  2. 'पुष्पा 2 द रुल'ची ट्रेलर रिलीज डेट आली समोर, अल्लू अर्जुननं दिलं चाहत्यांना सरप्राईज
  3. 'पुष्पा 2'मध्ये श्रीलीलाची अधिकृत एंट्री, पोस्टर रिलीज करून निर्मात्यांनी दिला चाहत्यांना सुखद धक्का...

Last Updated : Nov 17, 2024, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.