मुंबई - अभिनेत्री रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा' ही मालिका टीआरपी चार्टमध्ये नेहमीच टॉपवर होती. आता 'अनुपमा'च्या टीआरपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून हा शो काही वादांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, 'अनुपमा'मधील अनेक कलाकारांनी शोला टाटा-बाय-बाय केला आहे. दुसरीकडे, रुपाली गांगुलीच्या वैयक्तिक आयुष्यातही सध्या गोंधळ सुरू आहे. दरम्यान 'अनुपमा' शोच्या सेटवर एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. 'अनुपमा'च्या टीममधील एका सदस्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
'अनुपमा' मालिकेतील कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू : सोशल मीडियावर या अपघाताबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सेटवर विजेचा झटका लागल्यानं क्रू मेंबरचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेनंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्रू मेंबरला काही तांत्रिक गोष्टी हाताळत असताना विजेचा झटका लागला. या क्रू मेंबरचा चुकून विजेच्या तारेला स्पर्श झाला होता. दरम्यान ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. 'अनुपमा'च्या सेटवर असा निष्काळजीपणा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता केला जात आहे.
रुपाली गांगुलीवर केले सावत्र मुलीनं आरोप : सुरेश गुप्ता यांनी माध्यामाबरोबर बोलताना म्हटलं, "14 नोव्हेंबरला 'अनुपमा'च्या सेटवर झालेल्या अपघातात एका कामगाराचा जीव गेला. या कामगाराचे नाव विनीत कुमार मंडल होते. हा कॅमेरा असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याचे वय 32 वर्ष असून तो नेहमीप्रमाणे सेटवर काम करत होता." दरम्यान कॅमेरा असिस्टंट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ड्युटीवर होता. आता या शोमधील प्रमुख भूमिकेत असणारी रुपाली गांगुलीबद्दल बोलायचं झालं तर तिची सावत्र मुलगी ईशा वर्मानं तिच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. यानंतर रुपाली गांगुलीच्या वकिलानं तिच्या मुलीविरुद्ध 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. याशिवाय या तणावादरम्यान 'अनुपमा'च्या सेटवर काम करणाऱ्या कॅमेरा असिस्टंटचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या बातमीनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :