मुंबई - Actor Vijay on NEET : साऊथ अभिनेता राजकारणी थलपथी विजय यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात वैद्यकीय प्रवेश परीक्षा, नीट (NEET) रद्द करण्याच्या मुद्द्यावर आपले मौन सोडले. तमिलगा वेत्री कझगम (TVK) अध्यक्ष विजय म्हणाले की, " नीट परीक्षा रद्द करणे हा एकमेव उपाय आहे. नीट परीक्षा रद्द करण्याच्या राज्य विधानसभेच्या प्रस्तावाला विजय यांनी पाठिंबा दिला आहे. विजय यांनी म्हटलं, "नीट परीक्षेवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. देशाला नीटची गरज नाही. नीटमधून मुक्तता मिळणे हा एकमेव उपाय आहे. राज्य विधानसभेत नीटच्या विरोधात मंजूर झालेल्या ठरावाचं मी मनापासून स्वागत करतो."
थलपथी विजयनं केंद्र सरकारला विनंती :केंद्र सरकारला विनंती करताना त्यांनी म्हटलं, "मी केंद्र सरकारला विनंती करतो की, तामिळनाडूच्या लोकांच्या भावनांचा आदर करावा. शिक्षणाच्या विषयाला राज्यांकडं असलेल्या विषयांच्या यादीत आणले पाहिजे." यानंतर पुढं त्यांनी म्हटलं, '"अंतरिम उपाय म्हणून भारतीय संविधानात दुरुस्ती करून 'विशेष समवर्ती यादी' तयार करावी. त्यात शिक्षण आणि आरोग्याचा समावेश करावा." डीएमके राज्यसभा सदस्य पी विल्सन यांनी केंद्र सरकारला वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करण्याची आणि तामिळनाडूला स्पर्धात्मक परीक्षेतून वगळण्यासाठी विनंती केली होती. अशातच नीटचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तामिळनाडूमधून नीट परीक्षेला विरोध वाढला आहे.