मुंबई - Taapsee pannu wedding :अभिनेत्री तापसी पन्नूबाबत मोठी बातमी समोर येत आहे. तिनं बॅडमिंटनपटू मॅथियास बो यांच्याशी लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तापसी आणि मॅथियास बऱ्याचं काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तापसीच्या प्री-वेडिंग सुरूवात ही 20 मार्चपासून झाली असल्याचं म्हटलं जात आहे. आता 23 मार्च रोजी लग्न झालेल्या या लग्न सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते, असं सांगितलं जातंय. तापसीचं राजस्थानमधील उदयपूरमध्ये गुपचूप लग्न केल्याच्या बातम्याही झळकल्या आहेत.मात्र या जोडप्यानं लग्नाची घोषणा त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी खरंच लग्न केलंय की नाही याची खात्री अद्याप झालेली नाही. त्यांच्या लग्नात हिंदी चित्रपटसृष्टीमधून अनुराग कश्यप, पावेल गुलाटी आणि अभिलाष थपियाल हे उपस्थित होते, असंही सांगितलं जातंय.
तापसी पन्नूनं केलं लग्न? : आता सोशल मीडियावर पावेल गुलाटीनं या लग्नामधील एक फोटो शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तापसी लवकरच मुंबईत मित्र आणि सहकाऱ्यांसाठी पार्टी देणार आहे. आता पार्टीची ती लवकरच तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा केली जात आहे. लग्नाची फोटो शेअर करताना पावेल गुलाटीनं लिहिलं, ''ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आपण कुठे आहोत याची आपल्याला कल्पना नाही!'' तापसी तिच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलले नसली तरी तिला अनेकदा मॅथियासबरोबर पाहिले गेले आहे. काही आठवड्यांपूर्वी बातमी समोर आली होती की हे जोडपे शीख-ख्रिश्चन पद्धतीनं विवाह करणार आहे.