महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं त्याच्या वाढदिवसानिमित्त केली भावनिक पोस्ट... - SUSHANT SINGH BIRTH ANNIVERSARY

सुशांत सिंग राजपूतचा 21 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. या विशेष दिवशी त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत.

SUSHANT SINGH BIRTH ANNIVERSARY
सुशांत सिंगचा वाढदिवस (shweta singh kirti - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 21, 2025, 2:45 PM IST

मुंबई - दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला 5 वर्षांहून अधिक काळ झाला आहे, मात्र आजपर्यंत त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. सुशांत सिंग 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या बातमीमुळे त्याच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आज तो जगात नाही, मात्र त्याच्या आठवणी या त्याच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच जिवंत राहतील. टीव्हीपासून प्रवास करणाऱ्या या अभिनेत्यानं खूप कमी वेळामध्ये चाहत्यांच्या मनात एक घर केलं होतं. त्यानं स्वतःच्या बळावर चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली होती.

सुशांत सिंगचा वाढदिवस :दरम्यान अनेकदा सुशांत सिंगचे चाहते त्याला न्याय मागण्यासाठी आता देखील मागणी करत आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'स्टारचे, स्वप्न पाहणारा दिग्गज, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ! तुझा प्रकाश लाखो लोकांच्या हृदयात चमकतो. तू फक्त एक अभिनेता नव्हता, तू एक चांगला विचारवंत आणि प्रेमानं भरलेला आत्मा होतास. ज्या स्वप्नांचा तुम्ही निर्भयपणे पाठलाग केला, तुम्ही आम्हा सर्वांना सीमा ओलांडून जाण्यास, प्रश्न विचारण्यास आणि खोलवर प्रेम करण्यास शिकवले आहे.'

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीनं केली भावनिक पोस्ट शेअर : याशिवाय या पोस्टमध्ये तिनं पुढं लिहिलं, 'तुमचे स्वप्ने आणि विचार आमच्या नेहमी आठवणीत राहिल. तू फक्त एक आठवण नाहीस, तू एक ऊर्जा आहेस. तू एक अशी शक्ती आहेस, जी सतत प्रेरणा देत राहते. भाऊ, तुझ्यावरील माझे प्रेम शब्दांच्या पलीकडे आहे. तुझे नुकसान भरून काढता येणार नाही. सर्वांना सुशांत दिनाच्या शुभेच्छा.' दरम्यान श्वेता अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या भावाची आठवण करत असते. यापूर्वी श्वेतानं अंकिता लोखंडेला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अंकिता लोखंडे आणि श्वेता सिंग कीर्ती यांच्यात चांगले संबंध आहेत. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही पहिल्यांदा 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले होते. मात्र, सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर सुशांतनं रिया चक्रवर्तीला डेट केलं होतं. अनेकजण आता देखील रियाला सुशांतच्या मृत्यूचं कारण समजतात. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला काही दिवस तुरुंगात राहवं लागलं होतं.

हेही वाचा :

  1. सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता कीर्तीनं रक्षाबंधननिमित्त शेअर व्हिडिओ, लिहिला भावनिक संदेश - Raksha Bandhan
  2. अदा शर्मानं सुशांत सिंह राजपूतच्या अपार्टमेंटबद्दल केला खुलासा, वाचा सविस्तर - Singh Rajput apartment
  3. सुशांत सिंह राजपूतचा आज चौथा स्मृतिदिन; बहिणीनं पोस्ट करत केली 'ही' विनंती - Sushant Singh Rajput

ABOUT THE AUTHOR

...view details