मुंबई - Kanguva Latest Update:साऊथ स्टार सूर्या आणि बॉलिवूड स्टार बॉबी देओल स्टारर 'कांगुवा' या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. शिवा दिग्दर्शित हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता, मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान 'मैयाझगन' या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चच्या वेळी सुर्या म्हटलं, "अडीच वर्षांहून अधिक काळ 'कांगुवा'साठी 1000 हून अधिक लोकांनी खूप मेहनत घेतली आहे. मला माहीत आहे, ही मेहनत व्यर्थ जाणार नाही. तुम्ही या चित्रपटाला खूप प्रेम देणार. तो आल्यावर त्याला सर्व काही मिळेल."
'कांगुवा' चित्रपटाची रिलीज डेट :'कांगुवा'ची टीम अडीच वर्षांपासून मेहनत घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट सोलो रिलीज झाला पाहिजे, असं सुर्याचं म्हणणं आहे. आता 'कांगुवा' चित्रपटगृहात कधी रिलीज होईल याची अद्याप डेट ठरवलेली नाही. याशिवाय यानंतर सुर्यानं पुढं म्हटलं, "वेट्टैयान' 10 ऑक्टोबरला येत आहे. सन्मानासाठी हा चित्रपट पुढे नेला पाहिजे. रजनीकांत माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, माझा जन्म झाल्यावर त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. त्यांना 50 वर्षांहून अधिक तमिळ चित्रपटसृष्टीची ओळख आहे. मला वाटतं रजनीकांत यांचा चित्रपट आधी आला तर उत्तम. मला असं वाटतं की, तुम्ही माझ्याबरोबर असणार."