मुंबई - साऊथचा लोकप्रिय अभिनेता सुर्या आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या 'सूर्या 44' असं शीर्षक असलेल्या या सिनेमाची एक झलक शेअर केली आहे. निर्माता कार्तिक सुब्बाराज आणि सुर्या पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.
पोर्ट ब्लेअरमध्ये शूटिंग सुरू झाल्यानंतर लगेचच अभिनेता-दिग्दर्शक जोडीनं सोशल मीडियावर फर्स्ट लुक व्हिडिओ शेअर केला आहे. यातील सुर्याचा गँगस्टर अवतार प्रेक्षकांना सुखद धक्का देणारा आहे. यात तो अनोख्या आक्रमक अवतारात दिसत आहे.
'सूर्या 44' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 23 जुलै रोजी एक व्हिडिओ शेअर केला आहे. याची सुरुवात 'समुद्रात कुठेतरी' या हेडलाईननं झाली आणि त्यानंतर 'रॉयल इस्टेट' असे लेबल असलेल्या स्थानाच्या दोन्ही बाजूला गँग सुर्याची प्रतीक्षा करताना दिसते. व्हिडिओमध्ये पुढे "एक प्रेम, एक हशा, एक युद्ध... वाट पाहत आहे... एकाची" असे मथळे दिसत असताना सुर्या तोंडात सिगारेट आणि रिव्हॉल्व्हर घेऊन पडद्यावर अवतरतो. व्हिडिओच्या अखेरीस सुर्या त्याची रिव्हॉल्वर ताणतो आणि या आक्रमक अवतारासह त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. निर्मात्यांनी वाढदिवसाचा अनोखा टीझर शेअर करताना 'सुर्या 44' ची घोषणा केली आहे.
यापूर्वी सुर्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्तिक सुब्बाराज आणि त्याच्या टीमनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचं पोस्टर पोस्ट केलं होतं. पोस्टरमध्ये "आज रात्री 12:12" असे लिहिलेलं शस्त्र असलेल्या सुर्याची नाट्यमय छबी दाखवण्यात आली आहे.
'सुर्या 44' च्या निर्मात्यांनी यापूर्वी चित्रीकरण सुरू झाल्याच्या निमित्तानं एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामुळे सुर्याची थ्रोबॅक स्टाईल पाहिलेल्या चाहत्यांना खूप आनंद झाला. व्हिडीओची सुरुवात त्याच्या मागून घेतलेल्या शॉटने होते कारण तो समुद्राकडे न्याहाळणाऱ्या एका काठावर बसला आहे. या दृश्यात अभिनेता सुर्या रंगीबेरंगी स्ट्रीप टी-शर्ट घातलेला दिसत आहे. यामध्ये तो चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. या दोघांव्यतिरिक्त, चित्रपटात जयराम, करुणाकरन आणि जोजू जॉर्ज यांचा समावेश असलेल्या कलाकारांचा समावेश आहे.