महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deol Brothers : बॉबी देओल आणि सनी देओलनं झी सिने अवॉर्ड्समध्ये 'जमाल कुडू'वर केला भन्नाट डान्स - Deol Brothers Dance

Deol Brothers : सनी देओल आणि बॉबी देओलनं झी सिने अवॉर्ड्समध्ये 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या हिट गाण्यावर एकत्र डान्स केला आहे. आता त्याचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Deol Brothers
देओल ब्रदर्स

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 11:04 AM IST

मुंबई - Deol Brothers : 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या गाण्याची क्रेझ अजूनही संपलेली नाही. देशभरातील आणि जगभरातील लोकांनी या सुंदर गाण्यावर अनेक रिल्स तयार केले आहेत. बॉबी देओलनं 'ॲनिमल'मधील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. या गाण्याची खूप चर्चा देखील देखील झाली होती. 'ॲनिमल' चित्रपटामध्ये बॉबीनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता पुन्हा एकदा बॉबी देओलनं या गाण्यावर आपली जादू दाखवली आहे. मात्र यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ सनी देओल देखील होता. नुकतेच मुंबईत झी सिने अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते.

बॉबी देओल आणि सनी देओलचा व्हिडिओ व्हायरल : या कार्यक्रमात बॉबी देओल आणि सनी देओल हे दोघेही सहभागी झाले होते. देओल ब्रदर्सनं त्यांच्या प्रदीर्घ हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये पहिल्यांदाच एका अवॉर्ड शोमध्ये भाग घेतला आहे. या कार्यक्रमात बॉबी देओलनं स्टेजवर आपला डान्स परफॉर्मन्स दिला, तेव्हा डीजेनं बॉबीचं सुपरहिट गाणं 'जमाल कुडू' वाजवलं. 'जमाल कुडू' हे गाणं सुरू होताच बॉबी स्टेजवरून येऊन सनी देओलजवळ आला. यानंतर सनी देओलनं डोक्यावर ग्लास ठेवून शानदार डान्स केला. देओल ब्रदर्सचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडत आहे. आता अनेकजण सोशल मीडियावर या भावांचे कौतुक करताना दिसत आहे.

देओल ब्रदर्स वर्कफ्रंट : 2023 मध्ये सनी देओलनं 'गदर 2' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक केला आणि बॉबीनं रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. आता सनी हा 'लाहोर 1947' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त करण देओल प्रीती झिंटा आणि शबाना आझमी देखील आहेत. प्रीती आणि शबानाच्या व्यक्तिरेखेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे बॉबी हा 'कांगुवा' तामिळ चित्रपटामध्ये सूर्याबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा यांनी केलंय. ज्ञानवेल राजा, व्ही. वामसी कृष्णा रेड्डी आणि प्रमोद उप्पलापती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा :

  1. Bhool Bhulaiyaa 3 Shooting Video : कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं शूटिंग सुरू
  2. Christopher Nolan Movies : ऑस्कर विजेते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनचे 5 धमाकेदार चित्रपट
  3. Cillian Murphy : सिलियन मर्फीनं त्याचा पहिला ऑस्कर अवार्ड जे. रॉबर्ट ओपेनहायमरला केला समर्पित

ABOUT THE AUTHOR

...view details