महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

धर्मेंद्रची नात निकिता चौधरी थाटामाटात अडकली लग्नबेडीत; फोटो व्हायरल - धर्मेंद्रची नात निकिता चौधरी

Sunny And Bobby Deol Niece Wedding : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्रच्या नातीच्या लग्नामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचं लग्न राजस्थानमधील उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले.

Sunny And Bobby Deol Niece Wedding
सनी आणि बॉबी देओलच्या भाचीचं लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 3:28 PM IST

Updated : Feb 1, 2024, 5:16 PM IST

मुंबई - Sunny And Bobby Deol Niece Wedding :बॉलिवूडमधील देओल कुटुंबात यावेळी आनंदाचे वातावरण आहे. करण देओलच्या लग्नानंतर या घरात आणखी एक लग्न झालं आहे. धर्मेंद्रची नात आणि सनी-बॉबी देओलची भाची निकिता चौधरी ही लग्नबेडीत अडकली आहे. संपूर्ण कुटुंब सध्या राजस्थानमधील उदयपूरमध्ये आहे. सनी आणि बॉबीची बहिण अजिता देओल चौधरीनं आपल्या मुलीचं लग्न उदयपूरच्या अरावली रिसॉर्टमध्ये केलं असून सध्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. निकिता चौधरीचं लग्न 31 जानेवारी रोजी झालं असून सध्या या लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभय देओलने केले फोटो शेअर : निकीताच्या लग्नाचा भव्य समारंभ मोठ्यात थाटामाटात पार पडला. अभय देओलनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये नवविवाहित जोडपे दिसत आहे. हा विवाह सोहळा खासगी असल्यानं या कार्यक्रमात मोजके निमंत्रित उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा पंजाबी रितीरिवाजानुसार करण्यात आला आहे. या विवाहाला कुटुंबातील सदस्य उपस्थित असून काही परदेशी पाहुण्यांनी देखील उपस्थिती नोंदवली. निकिताच्या लग्नाआधी काही फोटो अभिनेता अभय देओलनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये संपूर्ण देओल कुटुंब सेलिब्रेशन करताना दिसत होतं.

धर्मेंद्रची नातीच्या लग्नामधील फोटो व्हायरल : डेस्टिनेशन वेडिंगसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमधील ताज अरावली रिसोर्टमध्ये यापूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्सनं लग्न केलं आहे. अलीकडेच याठिकाणी आमिर खानची मुलगी आयरा खानचे लग्न झालं होतं. निकिता चौधरी ही धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुलगी अजिता देओल चौधरीची मुलगी आहे. अजिता देओलनं यूएसमध्ये राहत असलेल्या डॉ. किरण चौधरी यांच्याशी लग्न केलं आहे. ती तिच्या पतीबरोबर कॅलिफोर्नियामध्ये राहते. या दोघांना प्रियांका आणि निकिता या दोन मुली आहेत. या दोघेही वडिलांप्रमाणेच डॉक्टर आहेत.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यनचे वर्षभरानंतर तोंडगोड, 'चंदू चॅम्पियन'च्या पॅकअपनंतर केला खुलासा
  2. "करण जोहर वाईट हेअरस्टाइल करतो" : मुलगा यशने दिली ब्रेकिंग न्यूज
  3. संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
Last Updated : Feb 1, 2024, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details