मुंबई - बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या जोर धरत आहेत. परंतु यावर दोन्ही बाजूंकडून कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही. दरम्यान, गोविंदाचा वकील आणि व्यवस्थापकानं खुलासा केला आहे की, सुनीताने ६ महिन्यांपूर्वी गोविंदापासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
सुनीताचा यांनी ६ महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज - अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदाच्या वकिलानं खुलासा केला की सुनीतानं ६ महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण नंतर परिस्थिती सुधारली आणि त्यांच्यात समझोता झाला. गोविंदाचा वकील म्हणाला की, "आम्ही नवीन वर्षात नेपाळला गेलो होतो. तिथं त्यांनी पशुपतिनाथ मंदिरात पूजाही केली. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे, प्रत्येक जोडप्याला लहान-मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांच्यातही ते घडलं, पण आता ते हे सर्व सोडून पुढे गेले आहेत."
वकील बिंदल यांनीही गोविंदा आणि त्याची पत्नी वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतात हे नाकारलं. त्यांनी सांगितलं की, "खासदार झाल्यानंतर गोविंदानं त्यांच्या घरासमोरच एक बंगला खरेदी केला होता. ते कधीकधी बंगल्यात मिटींगसाठी उपस्थित राहतात आणि तिथंच झोपतात पण सुनीता आणि गोविंदा दोघेही एकत्र राहतात, वेगळे राहत नाहीत."