मुंबई - Champions of Change Maharashtra award : 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' या पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेता मनोज बाजपेयी, शिल्पा शेट्टी, अर्जुन रामपाल, सोनू सूद, भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान यांच्यासह अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सुवर्णपदके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष, भारताचे माजी सरन्यायाधीश आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारताचे माजी अध्यक्ष, न्यायमूर्ती केजी बालकृष्णन, पुरस्कार निवड समितीचे उपाध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, न्यायमूर्ती ग्यान यांच्यासह इतर मान्यवर अतिथी आणि मान्यवर सुधा मिश्रा, इंटरएक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमीचे अध्यक्ष अधिवक्ता नंदन के झा, पुरस्कार निवड समितीचे ज्युरी सल्लागार, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि राजदूत दयाकर रातकोंडा IFS (निवृत्त) हे देखील उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांच्या नावांमध्ये डॉ. रवी शिंदे, डॉ. प्रिती रेड्डी, अंकित शर्मा, ए महेश रेड्डी, अमोल किशोर काळे, डॉ. अलोक शर्मा, डॉ. संजय मांजळकर, हेतवी शाह, रणजीत बिंद्रा, हर्ष गिरीश पटेल, आदित्य नायर, अंकिता गुप्ता, संदीप सिंग, श्रीगौरी सावंत, अर्जुन रामपाल, कृष्ण प्रकाश, सोनू सूद, फराह खान, मस्तान बर्मावाला, अब्बास बर्मावाला, शिल्पा शेट्टी, मनोज बाजपेयी, प्रा. दीपक धर, सुनिल गावस्कर, जनरल मनोज मुकुंद ननावरे, राम नाईक आदींचा समावेश आहे.
'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' या पुरस्काराने समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्था यांचा धैर्य, समाजसेवा आणि सामाजिक विकास या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या महान कार्याचा गौरव केला जातो. मराठा साम्राज्य आणि स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र’ पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांची निवड भारताचे माजी सरन्यायाधीश आणि NHRC इंडियाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती केजी बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक जूरी सदस्यांनी केली आहे.
काय आहे हा पुरस्कार?