महाराष्ट्र

maharashtra

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा केला पार - Stree 2 Box Office Collection Day 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 12:52 PM IST

Stree 2 Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2' हा स्वातंत्र्यदिनी रिलीज झाला. भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा ओपनर ठरल्यानंतर या चित्रपटानं अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Stree 2 Collection
स्त्री 2 कलेक्शन (स्त्री 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन (Film Poster))

मुंबई - Stree 2 Box Office Collection Day 2: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत एकूण 60.3 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या मते, 'स्त्री 2'नं सशुल्क प्रिव्ह्यूमध्ये 8.5 कोटीची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. तसेच या चित्रपटाचं एकूण देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन 76.5 कोटी रुपये झालं आहे. या कलेक्शनसह हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा ओपनर ठरला असून शाहरुखच्या 'जवान'-'पठाण' आणि सनीच्या 'गदर 2'ला मागं टाकलंं.

'स्त्री 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : दुसऱ्या दिवशी चित्रपटानं एकूण 30 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'स्त्री 2' चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या व्यतिरिक्त अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकार आहेत. 'स्त्री 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर तुफान कमाई करणार असं सध्या दिसत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खिलाडी अक्षय कुमार स्टारर 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा'ला टक्कर द्यावी लागली.

'स्त्री 2'मध्ये स्पेशल कॅमियो : मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत पेजवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत, यावर 76.5 कोटी रुपये हा आकडा आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रीय मल्टिप्लेक्समध्ये 3,92,000 तिकिटे विकली गेली, 'स्त्री 2'च्या आगाऊ बुकिंगनं देखील भारतीय चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटानं एकूण 25.63 कोटी कमावले होते. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2'मध्ये सरकटेची दहशत चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ही दहशत टाळण्यासाठी चंदेरीतील लोकांना पुन्हा 'स्त्री'ची आठवण येते. या चित्रपटात वरुण धवन, अक्षय कुमार आणि तमन्ना भाटिया यांच्यासह अनेक सरप्राईज कॅमिओ आहेत.

हेही वाचा :

  1. 'स्त्री 2'नं पेड प्रिव्ह्यूमध्ये केली मोठी कमाई, पहिल्या दिवशी 'गदर 2'चा रेकॉर्ड मोडेल? - Stree 2
  2. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू - Stree 2
  3. वरुण धवननं 'चिन तपाक डम डम'नंतर 'स्त्री 2'मधील गाण्याचा टीझर केला शेअर - Varun Dhawans share video

ABOUT THE AUTHOR

...view details