मुंबई - Stree 2 : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' आणि 'स्त्री'चा सीक्वल चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दिनेश विजानचा 'स्त्री' हा 2018 मधील सर्वात लोकप्रिय हॉरर चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. दरम्यान आज 17 जुलै रोजी 'स्त्री 2' मधील आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आता या चित्रपटामधील पोस्टर राजकुमार रावनं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राजकुमार रावनं लिहिलं, "तयार होऊन जा आता बिक्की आपल्या गँगबरोबर येत आहे. वर्षातील सर्वात मोठा हॉरर कॉमेडी चित्रपट. 'स्त्री 2'चं ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे."
'स्त्री 2'मधील नवीन पोस्टर झालं रिलीज :'स्त्री 2' चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट 'स्त्री'च्या रिलीजच्या 6 वर्षानंतर येत आहे. यावेळी प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरशिवाय वरुण धवन, तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, आकाश दाभाडे आणि फ्लोरा सैनी हे कलाकार दिसणार आहेत. पहिल्या भागात स्त्रीची दहशत होती. आता दुसऱ्या भागामध्ये सरकटेचा थरार पाहायला मिळणार आहे.