महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहरुखने पहिल्यांदाच लेक सुहाना खानसह शेअर केली स्क्रिन स्पेस - SRK teams up with Suhana

Suhana and Shah Rukh together : शाहरुख खान पहिल्यांदाच आपली मुलगी सुहाना खानसह स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसला आहे. त्याचा मुलगा आर्यन खानच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी त्याने मुलीसह काम केले आहे.

Suhana Khan and Shah Rukh together
सुहाना खान आणि शाहरुख एकत्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 10:29 AM IST

मुंबई - Suhana and Shah Rukh together : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अलिकडेच 'द आर्चिज 'या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करताना दिसली. यातील तिच्या भूमिकेचे कौतुकही झालं. शाहरुखचा मुलगा अभिनयात रस दाखवताना दिसत नाही, परंतु तो फिल्म मेकिंगचे तंत्रज्ञान शिकत आहे. तो उत्तम लेखन करतो असंही सांगितलं जातं. दरम्यान त्यानं एका कपड्याच्या ब्रँडची स्थापना करुन तो व्यवसायही करत आहे. आपल्या या दोन्ही मुलांच्या पाठीशी शाहरुख खान कायम ठामपणे उभा असतो. आता आर्यनच्या कंपनीच्या बँडच्या जाहिरातीसाठी स्वतः शाहरुखने कंबर कसली असून पहिल्यांदाच तो लेक सुहानासह जाहिरात करताना दिसत आहे.

"प्रत्येक चांगल्या कथेचा एक सीक्वेल असतो", असं म्हणत त शाहरुखनं ही जाहीरात त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. ही एक मनोरंजक आणि कल्पक जाहिरात आहे. शाहरुख खान त्याच्या अ‍ॅक्शनची झलक दाखवत लोगो बनवायचा प्रयत्न करतो इतक्यात एका दिशेने सुहानाची एन्ट्री होती. यामध्ये ती छान दिसत आहे. पूर्ण फिल्मी स्टाईलची ही जाहिरात सुहाना आणि शाहरुखच्या स्क्रिन शेअरिंगमुळे प्रेक्षणीय झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी आर्यन खानने इंस्टाग्रामवर जाहीर केले होते की त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या लेखानाचे काम पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही तो स्वतःच करणार आहे. पाच वर्षापूर्वी आर्यनच्या अभिनयात पदार्पणाबद्दल शाहरुखला विचारले असता त्यानं त्याच्या करिअरच्या महत्त्वकांक्षेबद्दल भाष्य केलं होतं.

शाहरुख म्हणाला होता की आर्यनला अभिनेता बनायचं नाहीय. तो एक चांगला लेखक आहे त्यामुळे त्याला अभिनय करायची इच्छा नाही. "मला वाटतं की अभिनेता होणं ही गोष्ट आतून यावी लागतेय, त्यामुळे त्याला माहिती आहे की तो अभिनेता होण्यापेक्षा चांगला लेखक होऊ शकतो. एकादी गोष्ट तुम्हाला करायची मनापासून इच्छा असेल आणि त्याची कौशल्य तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलात तर ते बनण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. त्यामुळं त्यानं ही गोष्ट मला जेव्हा सांगितली तेव्हा ते मला नीट लक्षात आलं," असं शाहरुख म्हणाला.

दुसरीकडे सुहाना खानने मात्र तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात प्रवेश केलाय. अलीकडेच तिने झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. निर्माता बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचाही हा पदार्पणचा चित्रपट होता.

हेही वाचा -

  1. 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल
  2. आलिया भट्टची 'लिटल वुमन' राहाने तिच्यासाठी महिला दिन बनवला आणखीन खास
  3. 'शैतान' एक्स रिव्ह्यू: अजय, आर माधवनच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? घ्या जाणून मते...

ABOUT THE AUTHOR

...view details