मुंबई - Srikanth screening : राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला 'श्रीकांत : आ रहा है सबकी आँखे खोलने' हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज १० मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी गुरुवारी रात्री अनेक हिंदी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींसह चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. यावेळी अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली मात्र या स्क्रिनिंगला गैरहजर होता.
श्रीकांतच्या स्टार स्टडेड स्क्रिनिंगला अलाया एफने वेधून घेतले लक्ष (Srikanth's star-studded screening) चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी आयोजित केलेल्या स्टार-स्टडेड इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि इंडस्ट्री इनसाइडर्स चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी एकत्र आले होते. या चित्रपटातील अभिनेत्री आलिया एफ हिने उपस्थित सर्वांचं लक्ष आपल्या स्टाईलनं वेधून घेतलं. चित्रपट दिग्दर्शक तुषार हिरानंदानी आणि 'बिग बॉस 17' च्या स्पर्धक आयेशा खान आणि फिरोजा खान उर्फ खानझादी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
राजकुमार राव यांच्याबरोबर अभिनेत्री ज्योतिका, आलया एफ आणि शरद केळकर हे कलाकार 'श्रीकांत : आ रहा है सबकी आँखे खोलने' चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी सिरीज यांनी टी सिरीज फिल्म्स आणि चेक अँड चेस फिल्म्स प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने सादर केला आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित, 'श्रीकांत : आ रहा है सबकी आँखे खोलने' या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी या पॉवरहाऊस त्रिकूटाने केली आहे. हा चित्रपट एक दृष्टिहीन भारतीय व्यावसायिक श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक ड्रामा चित्रपट आहे.
'श्रीकांत : आ रहा है सबकी आँखे खोलने' हा चरित्रात्मक नाट्यमय चित्रपट श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहे. दृष्टिहीन असूनही, धैर्यानं श्रीकांत बोल्ला यांनी आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा केला आणि बोलंट इंडस्ट्रीजची यशस्वी स्थापना केली. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या आणि अंध असलेल्या श्रीकांत यांनी 2012 मध्ये रतन टाटा यांच्या पाठिंब्यानं आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी बोलंट इंडस्ट्रीजच्या वतीनं सुपारी आणि रिसायकलिंग होऊ शकेल अशा पर्यावरणास अनुकूल उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि अपंग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली. कंपनीच्यावतीनं बनवण्यात येणाऱ्या उत्पादनामध्ये रिसायकलिंग केलेले क्राफ्ट पेपर, पॅकेजिंग आयटम, डिस्पोजेबल वस्तू आणि रिसायकलिंग केलेली प्लास्टिक उत्पादने यांचा समावेश आहे.
जन्मापासूनच संकटांचा सामना करण्यापासून ते इयत्ता 10 वी नंतर विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देण्यापर्यंत, श्रीकांत यांचा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. तरीही आपल्या उदात्त महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर यूएसए मधील प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी पहिला दृष्टीहीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवला होता.
हेही वाचा -
- स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’मधून प्राजक्ता माळीचं चित्रपट निर्मितीत पदार्पण - Prajakta Mali
- आशुतोष राणाने उलगडले 'मर्डर इन माहीम' मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेचं रहस्य - Ashutosh Rana
- '12वी फेल' स्टारचे कॅब ड्रायव्हरशी भांडण कॅमेऱ्यात कैद, सामान्य माणसासारखा लढला विक्रांत मॅसी - Vikrant Massey