मुंबई- South star Dhanush : साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार धनुष 2024 मध्ये येणाऱ्या त्याच्या दुसऱ्या 'कुबेर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चालू वर्षात धनुषचा अॅक्शन ड्रामा चित्रपट कॅप्टन मिलर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला तरी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. आता धनुषला कुबेर या चित्रपटातून त्याच्या चाहत्यांना नाराज करायचे नाही. अशा परिस्थितीत अभिनेता धनुषच्या एका सीनची खूप चर्चा होत आहे. या दृश्यातील त्याच्या समर्पणाचे कौतुक केले जात आहे.
शेखर कमुला कुबेर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर धनुष कुबेरसाठी मनापासून मेहनत घेत आहे. चित्रपटातील धनुषचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून त्याचे चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत. कुबेराला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले जाते, जो हिंदू संस्कृतीत एक देव देखील आहे, परंतु याउलट धनुष या चित्रपटात भिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
कचराकुंड्यासमोर शूटिंग