मुंबई - RAMOJI RAO PASSED AWAY : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झाले. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना 5 जून रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्टार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 87 वर्षांचे होते. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला होता. तसेच चित्रपटसृष्टीतील निर्माता चेरुकुरी यांनी रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली. रामोजी राव यांच्या निधनानं संपूर्ण साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'रॉबिनहूड' टीमनं दिग्गज रामोजी राव गारू यांना सेटवर श्रद्धांजली वाहिली आहे.
'रॉबिनहूड'च्या सेटवर वाहिली श्रद्धांजली : शनिवारी रात्री उशिरा 'रॉबिन हूड'च्या टीमनं दिग्गज रामोजी राव यांना सेटवर आदरांजली वाहिली. चित्रपट निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "टीम 'रॉबिनहूड'च्या सेटवर दिग्गज रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली. चित्रपट, मीडिया आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानाचं टीमनं स्मरण केलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." व्हायरल व्हिडिओमध्ये तेलुगू अभिनेता नितीन आणि इतर टीम रामोजी राव यांच्या फोटोसमोर प्रार्थना करताना दिसत आहेत. सर्वांनी त्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वांनी प्रार्थना केली आहे.