मुंबई -अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होईल. आज दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. आता चाहते चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर बारीक नजर ठेवून आहेत. यापूर्वी देखील या चित्रपटामधील अनेक धमाकेदार पोस्टर आणि गाणी रिलीज झाली आहेत.
'पुष्पा 2 द रुल:'मधील नवीन पोस्टर रिलीज : आज दिवाळीच्या मुहूर्तावर 'पुष्पा 2'चं नवीन पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता अनेकजण खुश आहेत. काहीजण या पोस्टरच्या पोस्टवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अल्लू अर्जुननं गुरुवारी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत 'हॅपी दिवाळी' असं लिहिलं आहे. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनबरोबर रश्मिका मंदान्ना देखील दिसत आहे. आता या पोस्टच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं, 'आमच्या आवडत्या हिरोला दिवाळीच्या शुभेच्छा.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'पुष्पा 2 ब्लॉकबस्टर असेल. आणखी एकानं लिहिलं, 'अण्णा, तुम्ही दिवाळीला परफेक्ट गिफ्ट दिलं आहे, अतिशय सुंदर पोस्टर आहे.'