मुंबई - अभिनेता सोनू सूदच्या म्हणण्यानुसार अॅक्शन ही त्याची ताकद आहे. दोन दशकांपूर्वी जेव्हा तो शूटआउट अॅट वडाळा आणि मॅक्सिमम सारख्या चित्रपटांमध्ये काम करत होता, तेव्हा त्यानं म्हटलं होतं की अॅक्शन चित्रपटांची वेळ आली आहे आणि त्याला पुढील अॅक्शन हिरो बनायचं आहे. बॉलिवूडसाठी हे आवश्यक आहे. त्यानं या स्टाईलमध्ये बरेच चित्रपट केले आहेत आणि आता तो त्याचा 'फतेह' हा नवीन चित्रपट घेऊन थिएटरमध्ये आला आहे. 'फतेह' हा एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच सोनूनं या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.
सायबर गुन्ह्यावर आधारित 'फतेह' ही मालिका एका ऑपरेशन्स ऑफिसरची आहे. हा अधिकारी एका मुलीची ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर सायबर माफियाशी लढण्यासाठी निवृत्तीनंतर बाहेर पडतो. तो त्याच्याशी लढत असताना, त्याच्यासमोर अधिक आव्हानं उभी ठाकतात. त्यामुळं चित्रपटात धमाकेदार अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळतात. या चित्रपटात सोनू सूदसोबत जॅकलिन फर्नांडिस, विजय राज आणि नसीरुद्दीन शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सूदने 'फतेह'बद्दल काय म्हटलंय?
'फतेह' बद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला, 'खरं तर, फतेह करताना मी जे काही शिकलो, ते अभिनेता म्हणून २० ते २२ वर्षांच्या संपूर्ण प्रवासात शिकलो नाही. फतेह माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे, कारण माझ्या मागील चित्रपटांमध्ये मी ज्या गोष्टी गमावल्या होत्या त्या सर्वांचं हे उत्तर आहे. काही प्रकारच्या अॅक्शन्स, शॉट-टेकिंग, पद्धती आणि एडिटिंग पॅटर्न - कॅमेऱ्यासमोर असताना मला जे काही वाटलं ते मी या चित्रपटात वापरलं. जेव्हा लोक ते पाहतील तेव्हा ते म्हणतील, 'असेच अॅक्शन चित्रपट बनवले पाहिजेत'. जेव्हा त्याला विचारलं गेलं की, तो याआधी कधीही या अवतारात दिसला नाही. यावर तो म्हणाला, "नाही, असं काही नाहीये, इंडस्ट्रीत गॉडफादर नसतानाही मला खूप संधी मिळाल्या. ज्यांनी मला काम दिलं त्यांच्याकडून मी शिकलो आहे आणि अशा प्रकारे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. पण जसं ते म्हणतात तसं तुम्हाला तुमचं नशीब तुमच्या स्वतःच्या हातांनी लिहावं लागतं."
'फतेह' चित्रपटाची कल्पना कधी सुचली?
'फतेह'ची कल्पना सुमारे साडेतीन ते चार वर्षांपूर्वी कोविड-१९ साथीच्या काळात सुचली. जेव्हा सूद देशभरातील गरजू लोकांना मदत करून लोकांचे मसीहा बनला होता. सोनू सूद म्हणाला, "कोविड दरम्यान जेव्हा मी लोकांना भेटत होतो, तेव्हा मला हे देखील जाणवलं की बरेच सायबर गुन्हे घडत आहेत आणि तिथून फतेहची कहाणी सुरू झाली. सायबर गुन्ह्यातून जाणाऱ्या एका सामान्य माणसाची ही एक अतिशय संबंधित कथा आहे. त्यावेळी मला वाटलं की लोकांशी जोडणारी कथा सांगणं महत्त्वाचं आहे. मला कधीच कल्पना नव्हती की आपल्याकडे ली व्हिट्करसारखे टॉप हॉलिवूड तंत्रज्ञ असतील ज्यांनी जुरासिक पार्क, फास्ट अँड फ्युरियस, कॅप्टन मार्वलमध्ये काम केलं आहे."
अॅक्शन सीक्वेन्स हा चित्रपटाचा आत्मा आहे