मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र ती कुठल्याही कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच, सब्यसाचीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनम कपूर स्पॉट झाली. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये ती रॅम्पवर चालताना दिसत आहे. रॅम्पवर चालताना सोनमला अचानक रडू आलं आणि नंतर हात जोडून पुढे जाते. तिच्या या व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोनम कपूरला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते.
सोनम कपूर रॅम्प वॉक करताना रडली :सोनम कपूरनं काल रात्री गुरुग्राम येथे दिवंगत डिझायनर रोहित बल यांना समर्पित फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. दरम्यान, दिवंगत डिझायनरची आठवण आल्यानंतर सोनम खूप भावनिक झाली आणि तिला रॅम्पवर अश्रू आवरता आले नाहीत. रोहित बल यांचं 1 नोव्हेंबर 2024 रोजी वयाच्या 63व्या वर्षी निधन झालं, यानंतर फॅशन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. दरम्यान शोमध्ये सोनम कपूरनं रोहित बल यांनी तयार केलेला पांढऱ्या रंगाचा फ्लोअर-लेंथ ड्रेस आणि फुल स्लीव्हज असलेले बेज प्रिंटेड जॅकेट परिधान केले होते. यावेळी तिनं तिचे केस अंबाडामध्ये बांधले होते. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं लाल गुलाब तिच्या अंबाड्याला लावले होते.