मुंबई - Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या मुंबईतील 'रामायण' या घरामध्ये सध्या बरेच काही घडत आहे. गेल्या शनिवारी 22 जून रोजी सोनाक्षीच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षीची आई पूनम सिन्हाबरोबर पूजेला हजर होती. 'हिरामंडी'ची को-स्टार मनीषा कोईरालानं सोनाक्षीच्या लग्नानिमित्त एक मोठी भेट आणि पुष्पगुच्छ पाठवला. सोनेरी चमकदार रंगीत गिफ्टिंग पेपरमध्ये गुंडाळलेली ही भेटवस्तू एका व्यक्तीनं आणून दिली, असल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. मनीषा कोईरालानं पाठवलेली भेटवस्तू खूप मौल्यवान असेल, असा अंदाज अनेकजण व्हिडिओ पाहून लावत आहेत.
सोनाक्षी सिन्हाचे फोटो व्हायरल :सोनाक्षीच्या घरी झालेल्या पूजेचं फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पवित्र प्रसंगी तिनं निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. व्हिडिओमध्ये सोनाक्षीच्या चेहऱ्यावर चमक दिसत आहे. ती आईबरोबर पूजास्थळी जाताना दिसली. तिनं पापाराझींसाठी एक क्यूट पोझही दिली. सात वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी आणि झहीर आज विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर हे कपल मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या आलिशान रेस्टॉरंट बास्टनमध्ये सेलिब्रेशन करणार आहे. या कार्यक्रमात हुमा कुरेशी, साकिब सलीम, आयुष शर्मा, 'हिरामंडी' कलाकारांसह अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात.