महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईहून अज्ञातस्थळी हनिमूनसाठी रवाना - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL

Sonakshi sinha and Zaheer: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईहून हनिमूनसाठी रवाना झाल्याचं समजत आहेत. आता त्यांचे विमातळावरील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sonakshi sinha and Zaheer iqbal
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल (IMAGE- ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 12:05 PM IST

मुंबई - Sonakshi sinha and Zaheer: बॉलिवूडची लेडी दबंग सोनाक्षी सिन्हानं नुकतेच तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न केलंय. या जोडप्यानं बराच काळ एकमेकांना डेट केलं आहे. दरम्यान, काल हे जोडपे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आशीर्वाद सेरेमनीमध्ये पाहुणे म्हणून दिसले होते. यावेळी सोनाक्षी सिन्हानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच झहीर इक्बालनं काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. आता 23 जूनला लग्न करून सोनाक्षी आणि झहीर हनिमूनला रवाना झाल्याचं कळत आहे. दरम्यान मुंबई विमानतळावरून त्याचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल काल रात्री मुंबई विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये दिसले. तिनं ग्रे वन पीसवर चेक शर्ट आणि डोक्यावर टोपी घातली होती. यात ती पूर्णपणे दबंग दिसत होती. दुसरीकडे झहीरनं ग्रे चेक शर्टवर काळ्या कार्गो पॅन्ट परिधान केला होता. सोशल मीडियावर युजर्स सोनाक्षी आणि झहीर हनिमूनला जात असल्याचा अंदाज लावत आहेत. त्याच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून त्याच्या लूकचं कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "सोनाक्षीचा लूक खूप सुंदर आहे आणि यात ती छान दिसत आहे. दुसऱ्या एकानं लिहिलं, "झहीर आणि सोनाक्षीचा कॅज्युअल लूक सुंदर आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं नात :सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल याचं लग्न खूप चर्चेचा विषय सोशल मीडियावर बनले होते. या लग्नामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. सोनाक्षीच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे आले नव्हते. आता लग्नानंतर सोनाक्षी ही खूप खुश आहे. ती अनेकदा आपल्या पतीबरोबर फोटो शेअर करत असते. झहीर आणि सोनाक्षीच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 7 वर्षांपासून डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. सोनाक्षीचा डेब्यू चित्रपट 'दबंग' स्टार सलमान खाननेही सोनाक्षीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नाला सलमान खानबरोबर अनेक स्टार्स उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हानं पोस्ट केला तिच्या लग्नातील सलमान खान, रेखासह सेलेब्रिटींचा व्हिडिओ - Sonakshi Sinha wedding
  2. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं हनीमूनमधील केले सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर - Sonakshi sinha and zaheer iqbal
  3. सोनाक्षी सिन्हाचे हाय हिल्स पती झहीर इक्बालनं घेतले हातात, युजर्सनं केलं ट्रोल - Sonakshi Sinha

ABOUT THE AUTHOR

...view details