महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'डॉन 3' चित्रपटासाठी चर्चेत असलेली शोभिता धुलिपालानं प्रियांका चोप्राबरोबरचा फोटो केला शेअर - Sobhita and priyanka

Sobhita Dhulipala and Priyanka Chopra : प्राइम व्हिडिओ इव्हेंटमध्ये साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला प्रियांका चोप्रा भेटली. आता तिनं सोशल मीडियावर प्रियांकाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

Sobhita Dhulipala and Priyanka Chopra
शोभिता धुलिपाला आणि प्रियांका चोप्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 1:44 PM IST

मुंबई - Sobhita Dhulipala and Priyanka Chopra : आजकाल प्रियांका चोप्रा मुंबईत आहे. 19 मार्च रोजी प्रियांकानं मुंबईत झालेल्या प्राइम व्हिडिओ इव्हेंटमध्ये तिची आगामी वेब सीरीज 'वॉम्ब' ही लॉन्च केली आहे. प्रियांका चोप्रानं करण जोहरची स्टेजवर भेट घेतली आणि तिच्या टीमबरोबर त्याची ओळख करून दिली. या कार्यक्रमात साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालाही दिसली. आता या कार्यक्रमधील शोभितानं प्रियांका चोप्राबरोबर फोटो क्लिक केले होते. तिनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या कार्यक्रमामधील फोटो शेअर केला आहे. यानंतर रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी स्टारर 'डॉन 3' या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड होत आहे.

शोभिता धुलिपाला शेअर केले फोटो : काही चाहते या पोस्टच्या कमेंट्स विभागात शोभिता धुलिपाला काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर तिला प्रश्न विचारत लिहिलं, ''डॉन 3' चित्रपटामध्ये तू काम करणार आहे का ?'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''डॉन 3' चित्रपटामध्ये तुझी कुठली भूमिका असणार आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''डॉन 3' चित्रपटात तुझी एंट्री खरचं झाली का?'' याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमेजीचा वर्षाव करताना दिसत आहेत. शोभितानं शेअर केलेला फोटो अनेकांना आवडत आहेत.

' डॉन 3' चित्रपटाबद्दल :या फोटोत प्रियांका चोप्रा निळ्या रंगाच्या कॉर्डसेटमध्ये दिसत आहे, तर शोभितानं डेनिम जीन्सवर ओव्हरसाईज शर्ट घातला आहे. या फोटोमध्ये दोघीही सुंदर दिसत आहेत. फरहान अख्तरनं रणवीर सिंगबरोबर 'डॉन 3'ची घोषणा केली होती. यानंतर प्रियांका चोप्राच्या 'रोमा' भूमिकेसाठी शोभिताचं नाव चर्चेत होतं, मात्र कियारा अडवाणीला या चित्रपटात ही भूमिका देण्यात आली आहे. आता ' डॉन 3' चित्रपटासाठी जान्हवी कपूरचं नाव देखील समोर आलं आहे. कियाराप्रमाणेच जान्हवीही 'डॉन 3'च्या निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली होती. यानंतर ती ' डॉन 3' चित्रपटामध्ये असल्याचा अंदाज अनेकजण लावत आहे.

हेही वाचा :

  1. Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत सीझन3'ची झाली घोषणा
  2. Ananya Panday : अनन्या पांडेचा पाहायला मिळणार एक अनोखा संघर्षमय प्रवास, 'कॉल मी बे'चा फर्स्ट लूक रिलीज
  3. पुलकित सम्राटची पत्नी क्रिती खरबंदानं 'पहिल्या रसोई'चे फोटो केले शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details