महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सिंघम अगेन ट्रेलर लाँच : सिंघम, सिम्बा, सुर्यवंशी आणि नव्या योद्ध्यासह लेडी सिंघमचाही धमाका - SINGHAM AGAIN TRAILER

Singham Again Trailer : रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या सिंघम अगेनचा बहुप्रतीक्षित ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा मल्टीस्टारर ट्रेलर कसा आहे हे जाणून घ्या.

Singham Again Trailer
सिंघम अगेन ट्रेलर लाँच (Singham Again (Photo: Film poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 7, 2024, 2:00 PM IST

Updated : Oct 7, 2024, 2:13 PM IST

मुंबई - रोहित शेट्टी निर्मित आणि दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाची बऱ्याच काळ प्रतीक्षा सुरू होती. अखेर एका दिमाखदार समारंभात हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. मल्टीस्टारर चित्रपट असलेल्या सिंघम अगेनच्या निर्मात्यांनी आज 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात ट्रेलरचे लॉन्चिंग केलं. चित्रपट निर्माता रोहित शेट्टी त्याच्या हिट कॉप ड्रामा "सिंघम" चा आणखी एक सिक्वेल घेऊन परत येत आहे.

'सिंघम अगेन' या मल्टीस्टारर चित्रपटात धमाकेदार अ‍ॅक्शन, नेत्रदीपक स्टंट्स आणि वेगवान दृष्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सिंघम, सिम्बा आणि सुर्यवंशी या तिकडीसह आता लेडी सिंघम बनून दीपिका पदुकोण पडद्यावर अवतरली आहे. याशिवाय करीना कपूरची वेगळी भूमिका, अर्जुन कपूरचा नवा अवतार यात पाहायला मिळतोय. रामायणातील कथानकाच्या धर्तीवर घडत असलेलं आधुनिक नाट्य यात पाहायला मिळतंय. भरपूर मनोरंजनाचा मसाला असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतो की नाही हे ट्रेलरवरुन सांगणं कठीण आहे. पण मल्टीस्टारर धमाका पाहायला मिळत असल्यामुळे अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, करीना, दीपिकाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे हे निश्चित झालंय.

सिंघम अगेनमध्ये अजय देवगण डीसीपी बाजीराव सिंघम म्हणून त्याच्या प्रतिष्ठित भूमिकेची पुनरावृत्ती करत आहे. यामध्ये नवीन कलाकार दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ सामील झाले आहेत. यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. 350 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटसह, या चित्रपटात अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्या बहुप्रतिक्षित कॅमिओसह करीना कपूर खान सिंघम फ्रँचायझीमध्ये परतताना दिसणार आहे. चुलबुल पांडेच्या भूमिकेतील सलमान खानही चाहत्यांना आश्चर्यचकित करेल अशी अपेक्षा आहे.

1 नोव्हेंबर 2024 रोजी अ‍ॅक्शन ड्रामा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Last Updated : Oct 7, 2024, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details