मुंबई - Ed Sheeran : मुंबईतील कॉन्सर्टममध्ये पहिल्यांदाच पंजाबीमध्ये गाऊन चाहत्यांना चकित केल्यानंतर ग्लोबल सिंगर एड शिरीन त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाला आहे. रविवारी मुंबईतील विमानतळावर एड शिरीन हा स्पॉट झाला. पापाराझींनी काढलेल्या व्हिडिओमध्ये एड शिरीन विमानतळाच्या एंट्री गेटकडे चालताना दिसत आहे. यावेळी त्यानं ब्लॅक अँड व्हाइट कॅज्युअल आउटफिट घातला होता. त्यानंतर त्यानं विमातळावर जमलेल्या चाहत्यांना शेकहॅन्ड करून निरोप घेतला. एड शिरीन भारतात आल्यापासून चर्चेत आहे. मुंबईतील कॉन्सर्ट हा शिरीनच्या आशिया आणि युरोप दौऱ्याचा भाग होता.
एड शिरीनचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल :एड शिरीननं मुंबईतील कॉन्सर्टमध्ये पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर स्टेज शेअर केला होता. व्हायरल क्लिपमध्ये महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर एड आणि दिलजीत स्टेजवर परफॉर्मन्स देताना दिसत आहे. एडनं दिलजीतबरोबर पंजाबी चार्ट-बस्टिंग ट्रॅक 'लव्हर' गाणं गायलं. दिलजीतनं शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक छोटी क्लिप शेअर केली आहे. यात त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एड शिरीन भाई पहिल्यांदा पंजाबीमध्ये गातोय. चक दिया गया.'' याशिवाय एडीनं देखील या कॉन्सर्टमधील व्हिडिओ शेअर करत लिहिले. ''आज रात्री मुंबईत मला पहिल्यांदा दिलजीत दोसांझबरोबर पंजाबीमध्ये गाण्याची संधी मिळाली. माझा भारतामधील हा अविश्वसनीय काळ आहे, पुढे आणखी काही असेल.''