महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूरनं ज्वेलरी शॉपमध्ये सेल्सवुमन म्हणून केलं काम, व्हिडिओ व्हायरल - Shraddha Kapoor - SHRADDHA KAPOOR

Shraddha Kapoor Sales Woman: अभिनेत्री श्रद्धा कपूरनं पुण्यामधील एका ज्वेलरी शॉपमध्ये सेल्सवुमन म्हणून काम केलं. यावेळी तिच्यासाठी दहा हजार रुपये कमावणं खूप अवघड झालं. तिचा हा खास अनुभव तिनं सोशल मीडियावरही शेअर केला आहे.

Shraddha Kapoor Sales Woman
श्रद्धा कपूर सेल्सवुमन

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 11:16 AM IST

मुंबई - Shraddha Kapoor Sales Woman :अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शक्ती कपूरची मुलगी आहे. ती नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना चकित करते. ती अनेकदा आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. अलीकडेच श्रद्धानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका दुकानात सेल्सवुमन म्हणून काम करताना दिसत आहे. एका व्हिडिओद्वारे तिनं या कामाचे खडतर वर्णनदेखील केलं आहे. याशिवाय श्रद्धा तिच्या कामासाठी चाहत्यांकडून गुणही मागितले आहेत.

श्रद्धा कपूर बनली सेल्सवुमन :22 एप्रिल रोजी श्रद्धा कपूरनं हा व्हिडिओ शेअर करत पोस्टवर लिहिलं होतं, "10 पैकी किती मार्क्स? पुण्याच्या दुकानात माझी पहिली विक्री...." व्हिडिओच्या सुरुवातीला, श्रद्धा पांढऱ्या ड्रेसमध्ये सेल्सवुमन म्हणून काम करताना दिसत आहे. तिनं पहिल्यांदा किती कमाई केली याबद्दल सांगताना दिसते. याशिवाय तिनं व्हिडिओमध्ये सांगितलं की, "कुठल्याही वस्तूची विक्री करणं खूप अवघड आहे. यानंतर पुढं व्हिडिओत श्रद्धा कॅज्युअल ड्रेसमध्ये दुकानाच्या गेटवर उभी राहून ग्राहकांचे स्वागत करताना दिसत आहे. यादरम्यान ती एका महिलेला दागिने खरेदी करण्यात मदत करताना दिसते.

श्रद्धा कपूरचं चाहत्यांनी केलं कौतुक : व्हिडीओच्या शेवटी श्रद्धा म्हणते, "ही माझी पहिलीच वेळ होती, तुम्ही हे केले तर तुम्हाला कळेल." याशिवाय तिनं सर्व विक्री कामगारांना नमस्कार केला. तिनं चाहत्यांना काही लर्निंग टिप्सदेखील व्हिडिओद्वारे दिल्या आहेत. श्रद्धानं सेल्सवुमन म्हणून दागिन्यातून तिनं 10,900 रुपये मिळविले. आता तिनं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "इतकी गोड सेल्सवुमन असेल तर मी खूप काही वस्तू विकत घेईल." आणखी दुसऱ्यानं लिहिलं, " मला या दुकानाचा पत्ता सांगा मी पहिली ट्रेन पकडून तिथे पोहोचलं." याशिवाय काहीजण या कामाबद्दल श्रद्धाचं कौतुक करताना दिसत आहे.

श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट : श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती पुढं राजकुमार रावबरोबर हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणादेखील असणार आहेत. 'स्त्री' 2018 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर झाला होता. 'स्त्री 2' या वर्षी ऑगस्टमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खान वाय प्लस सिक्युरिटीमध्ये करणार 'सिकंदर'ची शूटिंग - salman khan y plus security team
  2. दिशा पटानीचा बॅकफ्लिप स्टंट पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या -पाहा व्हिडिओ - Disha Patani
  3. बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून आयुष शर्मानं सलमानच्या बहिणीशी केलं होतं लग्न? यात किती तथ्य आहे? - Aayush Sharma

ABOUT THE AUTHOR

...view details