महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रिहानाच्या कॉन्सर्टमध्ये श्रद्धा कपूरबरोबर कोण आहे? व्हिडिओ व्हायरल - shraddha kapoor and rahul modi - SHRADDHA KAPOOR AND RAHUL MODI

Shraddha Kapoor: रिहानाच्या कॉन्सर्टमधील एका महिलेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात श्रद्धा कपूर ही कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी बरोबर दिसत आहे. आता सोशल मीडियावर तिच्या नात्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे.

Shraddha Kapoor
श्रद्धा कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 11:44 AM IST

मुंबई - Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू स्टार किड्सपैकी एक आहे. तिनं लोकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर अनेकदा ती आपल्या चाहत्यांबरोबर सुंदर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. श्रद्धाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबर दिसत आहे. नुसतेच श्रद्धा आणि राहुल एकत्र रिहानाच्या कॉन्सर्टमध्ये दिसले होते. एका महिलेनं कॉन्सर्टमध्ये श्रद्धाबरोबरचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ या महिलेनं तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

कोण आहे राहुल मोदी :यानंतर लगेच हा व्हिडिओ या महिलेनं तिच्या इन्स्टाग्रामवरून डिलीट केला आहे. यानंतर आता आणखी सोशल मीडियावर श्रद्धाबद्दल चर्चा होऊ लागली आहे. श्रद्धा आणि राहुलनं अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. पण हे दोघेही अनेकदा डेट आणि खास प्रसंगी एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान राहुलबद्दल बोलायचं झालं तर तो लेखक आहे. त्याला 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी', 'तू झुठी में मक्कर' सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. राहुलनं लव रंजनच्या 2011 मध्ये आलेल्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटाच्या सेटवर इंटर्न म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यानं दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानं चित्रपटसृष्टीत आता चांगली ओळख निर्माण केली आहे.

वर्कफ्रंट : श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटामध्ये रणबीर कपूरबरोबर दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. 'तू झुठी में मक्कर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 220 कोटीहून अधिक कमाई केली होती. पुढे ती दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या बहुप्रतीक्षित कॉमेडी हॉरर चित्रपट स्त्री 2 मध्ये पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव यांच्याबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ऑगस्ट 30 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलंय. याशिवाय श्रद्धा 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जॅकी भगनानीच्या घराबाहेर नवीन कारसह झाले स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Ranbir Kapoor and Alia Bhatt
  2. 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरनं घेतलं सर्वाधिक मानधन, वाचा डोळे फिरवणारे मानधनाचे आकडे - RAMAYANA STAR CAST FEE
  3. 'रियल' आणि 'रील' जीवनातील माय व लेक आल्या 'मायलेक' साठी एकत्र! - Mylek star cast

ABOUT THE AUTHOR

...view details