मुंबई : 2024 वर्ष दोन दिवसांनी संपणार आहे. हे वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीनं खूप खास ठरलं आहे. चालू वर्षात बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचले गेले आहेत. दरम्यान 'पुष्पा 2' हा 2024 वर्षातील सर्वात धमाकेदार चित्रपट ठरला आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट गेल्या 25 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. चालू वर्षात दोन चित्रपटांनी 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. याशिवाय तीन चित्रपटांनी 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता 2024 वर्ष कुठल्या अभिनेत्रींसाठी चांगलं ठरलं हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
श्रद्धा कपूर :14 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट 2024 मधील पहिला 500 कोटी कमाई करणार चित्रपट ठरला. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'नं 600 कोटी आणि जगभरात 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या कमाईसह, 'स्त्री 2'नं शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे अनेक विक्रमही मोडले. 2024मधील हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे 'स्त्री 2' आहे. याशिवाय 'भूल भुलैया 3', 'सिंघम अगेन' आणि 'शैतान' हे बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची टप्पा पार करू शकले नाही.