मुंबई - Shoaib and Sania Divorce : पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. 2010 मध्ये विवाहबद्ध झालेले हे जोडपे लग्नाच्या 14 वर्षानंतर वेगळे झाले आहे. घटस्फोटानंतर शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. शोएब मलिकचं हे तिसरे लग्न आहे. सानियापूर्वी शोएबनं आयेशा सिद्दीकीशी लग्न केलं होतं. सानिया आणि शोएब परस्पर संमतीनं एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाला एक मुलगा इझान आहे. इझान हा सानियासोबत दुबईत राहणार आहे. सानिया आणि शोएब मिळून त्यांच्या मुलाची जबाबदारी घेणार आहेत.
शोएब मलिकनं केला निकाह : शोएब मलिकनं 18 जानेवारी 2024 रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला असून या लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून शोएब मलिकला ट्रोल करत आहेत. अनेकजण सानिया मिर्झाला पाठिंबा देताना दिसत आहेत. शोएबला काही पाकिस्तानी लोक विश्वासघाती असल्याचं म्हणताना दिसत आहेत. 20 जानेवारी रोजी सोशल मीडियावर शोएब आणि सनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
- सानियाच्या एका चाहत्यानं पोस्टवर कमेंट करत प्रेमावरून विश्वास उठल्याचं म्हटलं आहे. टीव्ही विकून रिमोट घेतल्याचा टोलाही लगावला.सानियानं शोएबसोबत लग्न केलं, तेव्हादेखील चाहत्यांनी सुनावलं. अनेकांनी तिला खूप काही सुनावलं होतं. तर काही एक्स वापकर्त्यांनी सानियाबद्दल वाईट वाटतं असल्याची भावना व्यक्त केली.