मुंबई - Shamita Shetty Endometriosis :अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला एंडोमेट्रिओसिसचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज शमितानं 14 मे रोजी तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या आजाराबद्दल सांगताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, "तुम्हाला माहित आहे का की जवळपास 40% महिलांना एंडोमेट्रिओसिसचा त्रास होतो आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराची माहिती नसते! मला माझ्या दोन्ही डॉक्टरांचे, माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वारती आणि डॉ. सुनीता बॅनर्जी यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्या वेदनांचे मूळ कारण शोधून काढले. आता हा आजार शस्त्रक्रियेनं काढून टाकण्यात आला आहे. मी चांगल्या आरोग्याची अपेक्षा करत आहे. मी आता बरी, निरोगी आणि शारीरिक वेदनांपासून मुक्त आहे" हा आजार गंभीर असून यावर दुर्लक्ष करू नये.
शमिता शेट्टीनं दिला स्त्रीयांना संदेश : व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टीचा आवाज ऐकू येत आहे. शिल्पानं शमिताचा हा संदेश कॅमेऱ्यात कैद केला आहे. या पोस्टनंतर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण तिच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करेल." दुसऱ्या एकानं लिहिलं, "लवकर बरी हो शमिता आणि तब्येतीची काळजी घे." आणखी एकानं लिहिलं, "असे व्हिडिओ बनवत राहा पैसे यायला पाहिजे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत आहेत.