मुंबई - Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 'देवरा: पार्ट 1'मधून तेलुगूत पदार्पणासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर ज्युनियर एनटीआर दिसणार आहे. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी या चित्रपटामधील दुसरं गाणं 'धीरे धीरे' रिलीज झालं, आता या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या रोमँटिक ट्रॅकनं रिलीज होताच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या गाण्यात जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं दोघांमधील केमिस्ट्रीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जान्हवी कपूरनं शेअर केलं 'देवरा पार्ट 1'मधील गाणं :जान्हवी कपूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या गाण्याची झलक शेअर केली आहे. हे गाणं शेअर करताना जान्हवीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "फाइनली घरी परतल्यासारखं वाटतंय, 'देवरा'चं सेकंड सिंगल आता पूर्णपणे तुमचं आहे." यानंतर जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियानं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'व्वा व्वा व्वा 'मास." याशिवाय त्यानं दोन इमोजी देखील जोडले आहेत. शिखरनं जान्हवीचं खूप कौतुक केलंय. 'धीरे धीरे' हे गाणं अनिरुद्ध रविचंदरनं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला शिल्पा रावनं गायलं आहे. याशिवाय 'धीरे धीरे' गाण्याचे बोल कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत. आता हे गाणं अनेकांना आवडत आहे.