महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाच्या चर्चेवर शत्रुघ्न सिन्हानं दिली प्रतिक्रिया - shatrughan sinha - SHATRUGHAN SINHA

Shatrughan sinha : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं लग्नाच्या चर्चेवर शत्रुघ्न सिन्हानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा करत ते दिल्लीत असल्याचं सांगितलं आहे.

Shatrughan sinha
सोनाक्षी सिन्हा (शत्रुघ्न सिन्हा (IMAGE - IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 2:21 PM IST

Updated : Jun 11, 2024, 5:04 PM IST

मुंबई - Shatrughan sinha :बॉलिवूडची लेडी दबंग सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे. सोनाक्षीच्या लग्नाची कथित तारीखही व्हायरल झाली आहे. सोनाक्षी सिन्हा बाबतीत असं बोललं जात आहे की, ती तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता झहीर इक्बालबरोबर 23 जून रोजी लग्न करणार आहे. झहीर इक्बाल हा बॉलिवूड स्टार सलमान खानचा जवळचा असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या बातमीवर एक खुलासा केला आहे. शत्रुघ्न यांनी सांगितलं, "आजची मुलं लग्नासाठी विचारत नाहीत, तर सांगतात. मला माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल काहीही माहिती नाही."

शत्रुघ्न सिन्हाची प्रतिक्रिया : यानंतर त्यांनी पुढं सांगितलं, "सध्या मी दिल्लीत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर मी इथे आलो, मला या बातम्या मीडियाद्वारे कळल्या. मी माझ्या मुलीशी बोलल्यावरच मला काहीतरी कळेल. मला हवे आहे की, माझ्या मुलीला हवं ते सर्व सुख मिळावं, माझी मुलगी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही, माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर मी तिच्या लग्नात नाचणार आहे." सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत

वर्कफ्रंट :दोघेही नियमितपणे एकत्र पार्ट्यांमध्ये हजेरी लावत असतात. हे कथित कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा दोघेही आपले फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. दरम्यान, सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी 'हीरामंडीः द डायमंड बाजार' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. ही वेब सीरीज अनेकांना आवडली होती. आता या वेब सीरीजचा पुढचा पार्ट येणार आहे. याशिवाय पुढं ती 'हाऊसफुल्ल 5'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रितेश देशमुख, फरदीन खान , नोरा फतेही, कृती खरबंदा, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, मलाइका अरोरा, अक्षय कुमार, पूजा हेगडे आणि इतर कलाकर असणार आहेत. तसेच सोनाक्षी सिन्हा ही 'निकिता रॉय और द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. फोन हिसकावून पापाराझीच्या गर्लफ्रेंडशी वरुण धवननं मारल्या गप्पा, पाहा धमाल व्हायरल व्हिडिओ - Varun dhawan
  2. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचा सोनू सूदसह अनेकांना धक्का - Amol Kale pass away
  3. अभिनेत्री मलाबिकाच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टनं केले अंत्यसंस्कार, मृत्यूचे नेमके कारण काय? - Actress Noor Malabika Death
Last Updated : Jun 11, 2024, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details