महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहिद कपूरची क्लिप पाहून तुम्हीही रोखू शकणार नाहीत हसू, पाहा व्हिडिओ - शाहिद कपूरचा मजेदार अंदाज

Shahid kapoor : शाहिद कपूरनं त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेकजण लाईक करत आहेत.

Shahid kapoor
शाहिद कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 10:49 AM IST

मुंबई - Shahid kapoor :बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झी जिया'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची अनेकजण वाट पाहत आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झी जिया'मध्ये त्याच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे. शाहिद अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करत असतो. ते त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. दरम्यान शाहिदनं त्याचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. याचा हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

शाहिद कपूरनं शेअर केला एक सुंदर व्हिडिओ : व्हिडिओत शाहिद 'आवडत्या नातेवाईकाची' नक्कल करत आहे. त्याच्या वाढलेल्या वजनाबद्दलचा हा व्हिडिओ आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''माझे आवडते नातेवाईक.'' त्यानं या क्लिपमध्ये पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला असून एक काळा दुपट्टा डोक्यावर घेतला आहे. या पोस्टवर शाहिदच्या भावानं त्याला 'जॉनी लीव्हरिंग' असं म्हटलं आहे. शाहिदच्या पोस्टवर चाहत्यांनी मजेदार आणि हसरे इमोजी पोस्ट केले आहेत. अनेकांना शाहिदचा हा अंदाज अनेकांना खूप पसंत पडला आहेत. हा व्हिडिओ पाहून काहीजण शाहिदच्या हावभावांबद्दल बोलताना दिसत आहेत.

वर्कफ्रंट : शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया -अन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' मध्ये क्रिती सेनॉनसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र देखील आहेत. 'कबीर सिंग'च्या ब्लॉकबस्टर हिटनंतर शाहिद कपूर रोमान्स शैलीमध्ये परतला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते खूप आनंदित आहेत. अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित हा चित्रपट 9 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहिद पूजा हेगडेबरोबर 'देवा' चित्रपटात तो असणार आहे. शाहिद आणि पुजानं नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'सॅल्यूट' आणि 'कायमकुलम कोचुन्नी' यांसारख्या मल्याळम चित्रपटांसाठी ओळखले जाणारे रोशन एंड्रयूजनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. हा चित्रपट 2024च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांच्या कला जीवनातील जाणून घ्या टर्निंग पॉइंट, बहुरुपी अभिनयापासून झाले विनोदाचा बादशाह!
  2. मकबूलची 20 वर्षे : नजरेमुळे मिळाली इरफानला भूमिका तर 'सत्या'मुळे मुकला मनोज बायपेयी
  3. भुवन बामनं दिल्लीत खरेदी केलं 11 कोटीचं घर ?

ABOUT THE AUTHOR

...view details