मुंबई: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानं आता संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अलीकडेच एका चोरानं मुंबईतील वांद्रे परिसरातील सतगुरु शरण इमारतीतील सैफ अली खानच्या घरी 16 जानेवारी रोजी घुसखोरी केली होती. यानंतर सैफनं आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी चोराचा सामना करताना त्याच्यावर चाकूनं हल्ला करण्यात आला होता. तसेच त्याला नंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफ अली खानच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या शरीरातून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला गेला. या हल्ल्यामुळे बॉलिवूडपासून ते साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकर आता चिंतेत आहेत.
शाहिद कपूर केली चिंता व्यक्त : सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खानचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरनेही या संपूर्ण हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शाहिद कपूरनं त्याच्या आगामी अॅक्शन ड्रामा चित्रपट 'देवा'च्या प्रमोशन दरम्यान सैफ अली खानवरील हल्ल्याच्या मुद्द्यावर संवाद केला. शाहिदनं याप्रकरणी म्हटलं, "आम्हाला आशा आहे की तो आता बरा असेल, खरं तर, या हल्ल्यानंतर आम्ही सर्वजण खूप दुःखी आहोत. मला धक्का बसला, की त्याच्याबरोबर असं काही काय घडलं. मुंबईसारख्या शहरात असं होणं खूप कठीण आहे. मी हे खूप सुरक्षित शहर आहे." सध्या सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे. मात्र त्याच्या आयुष्यात अचानक घडलेल्या घटनेनं त्याचं संपूर्ण कुटुंब धक्क्यात आहे.